वित्तीय संस्थांमध्ये पैसे अडकलेल्या ठेवीदारांना सरकारने दिलासा द्यावा-आमदार शिरोळे यांची सूचना

Date:

जप्त मालमत्तांचे लिलाव आणि परतावा
याची कालमर्यादा निश्चित करावी

पुणे : वित्तीय संस्थांमधील ठेवीदारांना परतावा वेळेत मिळण्यासाठी जप्त केलेल्या मालमत्तांचे लिलाव विशिष्ट कालमर्यादेत व्हावेत, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी विधानसभेत आज (बुधवारी) केली.

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात कोर्टात फक्त ‘तारखेवर तारीख’ मिळत राहते. दोषी आर्थिक संस्था यात हेतूत: वेळकाढूपणा करतात, ज्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळण्यास विलंब होत जातो. हा विलंब इतका असतो की, त्यांच्या मालमत्तेचे मूल्य कमी होत जाते. काही ठेवीदार इतका पाठपुरावा करतात की, त्या ठेवीदारांचा मृत्यू होतो पण त्या कालावधीत त्यांना परतावा मिळालेला नसतो, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी वित्तीय संस्थामधील ठेवीदारांचे हितरक्षण या विधेयकावर बोलताना सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

ठेवीदारांना दिलासा देण्यासाठी फक्त मालमत्ता जप्त करून चालणार नाही, तर कायद्यानेच बंधन असे घालावे की, एकदा मिळकत (प्रॉपर्टी) जप्त झाली की, तिचा लिलाव आणि ठेवीदाराला परतावा मिळणे ही संपूर्ण प्रक्रिया गतीने होण्यासाठी कालमर्यादेचे बंधन घालावे, अशी सूचना आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डिलिव्हरी बॉय ना नोकरीतील हक्क देण्यासाठी कायदा करावा

-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी पुणे : महाराष्ट्रात लाखो तरूण...

जिल्ह्यातील एकूण 16 प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान

पुणे,दि.१: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त...

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा लाभ घ्यावा- वंदना कोचुरे

पुणे, दि. १: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील दारित्र्यरेषेखालील...