पुणे विभागात ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 33 हजार 605

Date:

पुणे विभागातील 8 लाख 32 हजार 767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
विभागात कोरोना बाधित 9 लाख 85 हजार 657 रुग्ण
-विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे, दि. 18 : पुणे विभागातील 8 लाख 32 हजार 767 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 9 लाख 85 हजार 657 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 33 हजार 605 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 285 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.96 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.49 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 7 लाख 9 हजार 769 रुग्णांपैकी 5 लाख 98 हजार 182 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 367 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 हजार 220 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.58 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.28 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 80 हजार 520 रुग्णांपैकी 66 हजार 242 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 269 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 78 हजार 377 रुग्णांपैकी 65 हजार 201 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 906 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 270 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 60 हजार 265 रुग्णांपैकी 51 हजार 737 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 6 हजार 610 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 918 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 56 हजार 726 रुग्णांपैकी 51 हजार 405 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 453 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 868 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 191 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 836, सातारा जिल्ह्यात 1 हजार 413, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 389 , सांगली जिल्ह्यात 962 तर कोल्हापूर जिल्ह्यात 591 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 13 हजार 565 आहे. पुणे जिल्हयामध्ये 11 हजार 723, सातारा जिल्हयामध्ये 661, सोलापूर जिल्हयामध्ये 542, सांगली जिल्हयामध्ये 363 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 276 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 58 लाख 66 हजार 203 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 9 लाख 85 हजार 657 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 17 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
00 0 0

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पार्किंग बंद, बाहेर दुचाकींवर दंड; एरंडवण्यातील व्यावसायिक इमारतीवरून खर्डेकर आक्रमक

पार्किंग तातडीने खुले करण्याची महापालिकेकडे मागणी; तोपर्यंत ग्राहकांच्या दुचाकींवर...

नेपाळ आपत्ती : पुण्यातील आठ जण सुरक्षित

एक महिला मुंबईत सुखरूप पोहोचली; कैलास पर्वत परिसरातील सात...

राज्यस्तरीय बालविकास कार्यशाळेत पुण्याच्या ‘अर्बन95’ प्रवासाचे सादरीकरण

बालक-केंद्रित शहरी नियोजनावर पुणे महापालिकेचा भर; ‘पुणे किड्स फेस्टिव्हल’मध्ये...

देशभरात NEET-PG 2026 परीक्षा संपन्न; जयपूरमधील 2,445 उमेदवारांची 5 सप्टेंबरला पुनर्परीक्षा

2.73 लाख उमेदवारांसाठी 1,111 केंद्रांवर आयोजन; 2.65 लाखांहून अधिक...