दंतवैद्यक क्षेत्रात कुशल सहाय्यकांची गरज : डॉ. नितीन बर्वे

Date:

‘स्माईल ए व्हाईल डेंटल केअर’तर्फे डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : “दाताच्या दवाखान्यात डॉक्टरांच्या हाताखाली कुशल सहायक असेल, तर दंतवैद्यकांना मोठी मदत होते. रुग्णांना हाताळण्यासाठी अशा कुशल सहाय्यकांची दंतवैद्यक क्षेत्राला गरज असून, स्माईल ए व्हाईल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटर आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने सुरु केलेला औपचारिक कौशल्यविकास अभ्यासक्रम उपयुक्त ठरेल,” असे प्रतिपादन इंडियन डेंटल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन बर्वे यांनी केले.
दंतवैद्यक डॉ. नेहा दाते संचालित स्माईल ए व्हाईल डेंटल केअर अँड इम्प्लांट सेंटरतर्फे पाचव्या वर्धापन दिनानिमित्त ‘डेंटल असिस्टंट प्रमाणपत्र अभ्यासक्रम’ या पुस्तकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. शनिवार पेठ येथील क्लिनिकमध्ये झालेल्या या सोहळ्याप्रसंगी हुजूरपागा हायस्कूलच्या माजी प्राचार्या अलका काकतकर, आर्किटेक्ट व मालमत्ता मूल्यकर्ता अर्चना दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. नेहा दाते म्हणाल्या, “इन्फेक्शन कंट्रोल प्रोटोकॉल, पेशंटशी बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, राहणीमान, डेंटल मटेरियल व साहित्य हाताळणी, निर्जंतुकीकरण अशा सगळ्या गोष्टी या पाठ्यक्रमात समाविष्ट केल्या आहेत. गेल्या दोन वर्षात आठ बॅचेसमधून ६१ मुली आणि महिलांना रोजगार देता आल्याचे समाधान आहे. १० वी उत्तीर्ण मुली-महिला आज १२ हजार पगार मिळवत असून, कुटुंबाला हातभार लावत आहेत. या अभ्यासक्रमामुळे समाजातील अनेक गरजू मुलींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. गरजू महिलांना यार्दी वस्ती प्रकल्पातून अर्थसहाय्य पुरवले जाणार आहे.”
गाडगीळ यांच्या ‘ट्रेन डेन्ट’चे लोकार्पणदंतवैद्यकांना सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना मार्गदर्शक असे ‘ट्रेन डेन्ट’ ऍप विकसित करण्यात आले आहे. ऍपच्या मदतीने त्यांच्या ज्ञानात आणि कार्यक्षमतेत भर पडणार आहे. प्रसिद्ध निवेदक, मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते या ऍपचे लोकार्पण करण्यात आले. ज्येष्ठ ऑर्थोडोंटिक्स डॉ. जयेश रहाळकर, ज्येष्ठ फॅमिली फिजिशियन डॉ. धनंजय शिरोळकर, केदार आठवले हे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेच्यामाध्यमातून गर्भवती महिलांना मोठा दिलासा

जिल्ह्यात ३२ हजाराहून अधिक नवीन लाभार्थ्यांची नोंदणी पुणे, दि. १६:...

लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसचा कोनशिला समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संपन्न

सेवाभावनेने कार्य करणाऱ्या धर्मादाय संस्थांना शासनाचे सहकार्य राहील-मुख्यमंत्री देवेंद्र...

फेरीवाल्यांना दिलासा; नोंदणी नूतनीकरण व शुल्क भरण्यास मुदतवाढ

पुणे : महापालिकेच्या हद्दीतील नोंदणीकृत व पुनर्वसन झालेल्या फेरीवाल्यांना...

ओव्हरहेड केबल,अनधिकृत होर्डींग्ज प्रकरणी स्थायी समितीच्या सभेत प्रशासनाच्या बेफिकिरीचा झाला पर्दाफाश

ओव्हरहेड केबल भूमिगत करण्यासाठी नियमावली करण्यास प्रशासनाला १० दिवसांची...