Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्त्री मनाचा वेध घेणार ‘द मुक्ता बर्वे शो’

Date:

‘स्त्री’ या शब्दाला समाजात मोठं वलय आहे. आई, मुलगी, बहिण, मैत्रीण आणि बायको असे विविध नात्यांमध्ये बंधलेली भावनिक व्यक्ती म्हणजे ‘स्त्री’ ! बदलत्या समाज आणि परिस्थितीनुरूप ‘स्त्री’ ची व्याख्या देखील बदलत गेली, कालांतराने आधुनिक युगात ‘स्त्री’ या शब्दाचा अर्थदेखील विकसित झाला. आजची ही स्त्री बहुगुणी आहे, चूल आणि मुल यांसोबतच तिच्या विश्वात अनेक गोष्टींचा समावेश झाला आहे. तिच्या याच विश्वाचा वेध लवकरच माय एफएमच्या माध्यमातून घेतला जाणार आहे. मराठीच्या स्टार अभिनेत्रींमध्ये गणली जाणारी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.

आजच्या स्त्रीच्या संकल्पना, विचार तसेच त्यांना व्यक्त होण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मुक्ता ‘द मुक्ता बर्वे शो’ या कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देणार आहे. आतापर्यत अभिनयात विशेष वेगळेपण जपणारी मुक्ता आता रेडियोजॉकीच्या रुपात तिच्या चाहत्यांसमोर येत आहे. विशेष म्हणजे एका सेलिब्रिटीद्वारे जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्याचा हा पहिलाच प्रयोग माय एफ एम रेडियो वाहिनीमार्फत राबविला जात आहे. दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ वाजता मुक्ताच्या आवाजातला हा शो पश्चिम महाराष्ट्रात सुरु होत आहे.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे या कार्यक्रमाला चांगला न्याय देऊ शकेल असा विश्वास माय एफएम ला असून, हा कार्यक्रम स्त्री विकासावर आधारित असल्याचे ते सांगतात.  शिवाय हा योग जुळवून आणणारे जीसिम्स्चे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बरान हे  देखील या शोसाठी उत्सुक आहे. ‘एफएम मधून हा आगळावेगळा उपक्रम आम्ही राबवीत असून, यातून स्त्री विकासाचे अनेक पैलू मांडले जातील’ असे त्यांनी सांगितले.

गंभीर आणि सामाजिक विषयावर आधारित अनेक चित्रपटातून नावारूपास आलेली मुक्त बर्वे आज यशाच्या उंचीवर आहे, आपल्या भूमिकेतून स्त्री विषयपर अनेक समस्यांना वाचा फोडणारी हि अभिनेत्री प्रथमच एमएमच्या माध्यमातून जनसामान्यांशी संवाद साधणार आहे. त्यामुळे श्रोते तिचा आवाज ऐकण्यास नक्कीच आतुर झाले असतील, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. स्त्री मानसिकतेचा अचूक वेध घेण्यास सज्ज असलेली मुक्ता या कार्यक्रमात काय कसब दाखवते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ट्रेलरमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, चालकाचा दुर्दैवी अंत

पुणे-पुण्यात अवजड वाहनांकडून होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे....

नवी मुंबईतील कंपनीत गॅस गळती:कामगारांवर कार्बन मोनॉक्साईडचा परिणाम, 25 महिला बेशुद्ध

नवी मुंबईतील एका कंपनीमध्ये गुरुवारी सकाळी गॅस गळतीची घटना...

PMRDA आयुक्त यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या दहाव्या वर्धापन...