Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

१०० स्टेशने असलेली कार्यक्षम मेट्रो पुण्यात शक्य :जावडेकर

Date:

पुणे :
पीएमआरडीए ,मेट्रो ,नदी सुधारणा ,सुलभ प्रशासन यासह शहर विकासाची दृष्टी आमच्यकडेच असल्याचे सांगत १०० मेट्रो स्टेशन असलेली मेट्रो भावी काळात पुण्यात धावणे हे शक्य असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सायंकाळी केले
‘जयसन्स ग्रुप ‘ आयोजित ‘परवडणारे गृहप्रकल्प आणि केंद्र शासनाची धोरणे ‘या विषयावर आयोजित व्याख्यान आणि नागरिकांशी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते
महात्मा सोसायटीच्या मैदानावर (कोथरूड ) येथे आयोजित या संवाद कार्यक्रमाला संयोजक अमृता देवगावकर ,मंदार देवगावकर ,’सस्टेनेबल इनिशिटीव्ज ‘ च्या अनघा परांजपे -केसकर ,सोसायटी अध्यक्ष उल्हास पवार ,दिलीप वेडे -पाटील ,श्रद्धा प्रभुणे ,गणेश जाधव ,राजेंद्र आवटे ,मंदार केळकर ,श्री किरण दगडे आदी उपस्थित होते
यावेळी नागरिकांनी पीएमआरडीए ,उड्डाणपूल ,मेट्रो ,बांधकाम परवानग्यांचे बदलणारे नियम ,वाहतूक समस्या ,आदी विषयांवर प्रश्न विचारले .त्याला समर्पक उत्तरे देत गल्लीपासून दिल्लीत भाजप सरकार हे उत्तर असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले .
ते म्हणाले ,’मोदी सरकार हे पूर्ण परिवर्तनाचा विचार करीत आहे . त्यामुळे एलईडी बल्ब पासून स्टेण्ट च्या किमती कमी करण्याचा विचार होत आहे . यापूर्वी त्यातून स्वतःचे खिसे भरण्याचा विचार केला जायचा . पुण्याला नदी स्वच्छतेसाठी आम्ही निधी दिला ,मेट्रो मंजूर केली आणि पीएमआरडीए मन्जुर केले . मात्र ‘इंच इंच विकू ‘ म्हंणणाऱ्या आधीच्या सरकारने १९९७ साली आम्ही मंजूर केलेली पीएमआरडीए कार्यान्वित केली नाही
पुण्याच्या बृहत आराखड्यात पुण्याच्या सर्वांगीण विकासाचा विचार आम्ही करीत आहोत . त्यासाठी निधी देत आहोत . पुण्यात मेट्रोची एक लाईन जरी प्रस्तावित असली तरी १०० स्टेशनांची मेट्रो ,तीदेखील दिल्लीसारखी कार्यक्षम ,अस्तित्वात आणणे शक्य आहे . मेट्रोसाठी रस्ते खणण्यासारख्या ‘प्रसववेदना ‘होणार ,पण ,पुणेकरांनी त्यासाठी तयारी ठेवली पाहिजे
अमृता देवगावकर यांनी सूत्रसंचालन केले ,मंदार देवगावकर आणि उल्हास पवार यांनी प्रकाश जावडेकर यांचे स्वागत केले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी- ॲड. अनुरुद्र चव्हाण यांची निवड

पुणे : महाराष्ट्र टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अर्थात कर सल्लागार...

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसुंधरा फाऊंडेशनचे कार्य गौरवास्पद : ममता सिंधूताई सपकाळ

पुणे : एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जेव्हा एक भावना, दिशा...

अब्दुल कलाम ई-लर्निंग स्कुल मुलांच्या किलबिलाटाने गजबजले

पुणे- आज महाराष्ट्र राज्यातील बहुतांश आणि पूणे मनपाच्या सर्व...