- ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सची यंदाची बॅच रशियाला रवाना
ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सची (एकेईसी) विद्यार्थ्यांची यंदाची बॅच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेल्या आठवड्यात मुंबईहून रशियातील कलिनीनग्राड येथील इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीसाठी रवाना झाली.
ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स ही संस्था रशियन फेडरेशनमधील वैद्यकीय शिक्षणाबाबत मार्गदर्शन करण्यात गेल्या २० वर्षांपासून प्रवर्तक म्हणून सुविख्यात आहे. आजवर या संस्थेच्या माध्यमातून हजारो डॉक्टरांनी रशियातून त्यांचे शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले असून ते भारतात यशस्वीपणे कार्यरत आहेत. ‘एकेईसी’ त्यांच्या विद्यार्थ्यांना रशियातून एमबीबीएस अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावर भारतातील नॅशनल एक्झिट टेस्ट (नेक्स्ट) या पात्रता परीक्षेच्या तयारीसाठीही मार्गदर्शन करत आहे.
यासंदर्भात ‘एकेईसी’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अमित कामले म्हणाले, “ कोरोना महामारीमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीती व चिंतातुरतेची भावना आहे, परंतु आम्ही या महामारीच्या काळातही वैद्यकीय शिक्षण अखंडित सुरू राहील अशी व्यवस्था केली आहे. रशियामध्ये जाऊन कॅम्पसमधून शिक्षण पूर्ण करण्याच्या विद्यार्थ्यांच्या इच्छेचा आम्ही आदर करतो. त्याचबरोबर भारतात राहून आपले शिक्षण ऑनलाईन माध्यमातून पूर्ण करण्याचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनाही आम्ही मदत करत आहोत.”
इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीमध्ये चौथ्या वर्षाची विद्यार्थिनी सोनाली सरदार म्हणाली, की उत्तम डॉक्टर बनून लोकांची खडतर प्रसंगात सेवा करण्याचे माझे स्वप्न आहे आणि ते साकारण्यासाठी मी स्वेच्छेने रशियाला माघारी चालले आहे.
याच युनिव्हर्सिटीत तिसऱ्या वर्षाचा विद्यार्थी पुष्कर दाने म्हणाला, की ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सने करोना महामारीच्या काळात केलेले अचूक मार्गदर्शन व वेळोवेळी दिलेली ताजी माहिती यामुळे मला माझ्या सत्रांमध्ये खूपच मदत झाली.
काही काळापूर्वी भारतीय विद्यार्थी रशियन फेडरेशनच्या केवळ स्टेट विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जात असत, परंतु आता ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सच्या प्रयत्नांमुळे भारतीय विद्यार्थ्यांनी रशियाच्या फेडरल युनिव्हर्सिटीलाही वाढती पसंती देण्यास सुरवात केली आहे. रशियाच्या वेस्ट-युरोपियन क्षेत्रातील इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटीची वाढती पसंती आहे कारण त्यांना आणि पालकांना ठाऊक झाले आहे, की जागतिक दर्जाच्या व जागतिक गुणवत्ता श्रेणीच्या विद्यापीठांमध्येही आपल्या खिशाला परवडणाऱ्या खर्चात शिक्षण घेता येते. डॉ. कामले यांच्या संस्थेने भारतीय शिक्षण क्षेत्रात हाच बदल घडवून आणला आहे.

