Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पोलीस उपअधीक्षकाची पत्रकारांवर अरेरावी

Date:

पुणे-मुंबई महामार्गावरील एका घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या ‘एमपीसी न्यूज’च्या वार्ताहरांसोबत पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर यांनी अरेरावी केली. हा प्रकार सोमवारी (दि. 23) दुपारी चारच्या सुमारास पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर भक्ती-शक्ती चौकाजवळ पुणे गेट हॉटेलसमोर घडला.

सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास दहा ते पंधरा जणांनी अचानक ‘चक्का जाम ‘ म्हणत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील मालवाहतूक करणारी वाहने रोखली. यावेळी वाहन चालकांच्या संमतीशिवाय वाहनांची कागदपत्रे तसेच मालाचे चलन यांसारखी महत्वपूर्ण कागदपत्रे टोळक्याने जबरदस्तीने नेली. याबाबत स्थानिक नागरिकांनी येथील ‘एमपीसी न्यूज’च्या वार्ताहरांना फोन करून माहिती दिली. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी ‘एमपीसी न्यूज’चे दोन प्रतिनिधी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर आणि त्यांची टीम घटनास्थळी होती. त्यांच्या कामात कोणताही अडथळा न आणता ‘एमपीसी न्यूज’च्या छायाचित्रकाराने घटनास्थळाचे फोटो काढले.

यावर पोलीस उपअधीक्षकांनी वार्ताहरांना फोटो का काढले, असे खडसावून विचारले. त्यावर ‘एमपीसी न्यूज’च्या प्रतिनिधीने आपली ओळख सांगितली.  वाहने अडविल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्याचे बातमीसाठी फोटो काढल्याचे स्पष्ट केले.

छायाचित्रकारांच्या या उत्तरावर चिडलेल्या पोलीस उपअधीक्षकांनी ‘फोटो काढताना मला का विचारले नाही’, म्हणून दरडावले. वाहनांच्या रांगा लागल्या आहेत, त्यामुळे फोटो काढले, असे एमपीसी न्यूजच्या छायाचित्रकाराने सांगताच त्यावर ‘तू मला शिकवू नको.  विचारल्याशिवाय फोटो काढायचे नाहीत.’, असे पोलीस उपअधीक्षकांनी पुन्हा दरडावले.यानंतर ‘एमपीसी न्यूज’चे वार्ताहर आणि छायाचित्रकार रस्त्याच्या बाजूला वाहनचालकांशी संवाद साधत असताना देखील, ‘इथे काय करतोय. चल बाजूला हो.’ असे म्हणत वाहनचालकांशी संवाद साधण्यासही मनाई केली.

पोलीस उपअधीक्षक दर्जाच्या अधिका-याने वार्तांकनाचे कर्तव्य बजावणा-या पत्रकारांना अशा पद्धतीची अरेरावी केल्याबद्दल पत्रकारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.  यासंदर्भात सर्व पत्रकार मिळून पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांना समक्ष भेटून तक्रार करणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्यावतीने वासंतिक चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

‘भारतीय वारकरी मंडळा’ची भजन सेवा पुणे– हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती...

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....