Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

काकासाहेब शिंदे मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करा – संभाजी ब्रिगेड (व्हिडीओ)

Date:

पुणे -मराठा आरक्षणासाठी आत्महत्या -बलिदान केलेल्या शिंदे नामक तरुणाच्या मृत्युप्रकरणी मुख्यमंत्र्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी भूमिका आज येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने जाहीर करण्यात आली .
पुणे श्रमिक पत्रकार संघ, येथे आज संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे ,संतोष शिंदे आणि संतोष गजरे यांनी  पत्रकार परिषद घेतली .
यावेळी ते म्हणाले ,
‘मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे,या मागणीसाठी ‘संभाजी ब्रिगेड’ व इतर मराठा संघटनाच्या वतिने राज्यभर आंदोलन सुरू आहेत. मुख्यमंत्री फडवीस यांना पंढरपूर येथे विठ्ठल’लाची महापुजा करू न देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कारण जर मुख्यमंत्री मराठा – धनगर आरक्षणाचा आध्यादेश घेऊन पंढरपुरात घेऊन येणार नाहीत… तोपर्यंत संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही व मुख्यमंत्री यांना पाय ठेवू देणार नाहीत… असा निर्णय घेतला होता. कारण राज्य सरकार आरक्षण प्रश्नावर समाजाला फसवत आहे. म्हणून महाराष्ट्रभर संतापाची लाट पसरली आहे. भाजप व फडणवीस सरकारला सत्तेवर राहायचा अधिकार नाही. खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा…
म्हणून… वैतागून संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष यांच्या भाऊ काकासाहेब शिंदे यांनी गंगापुर येथील कायगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रात जल समाधी घेतली… पोलीस व प्रशासन’च्या ढिसाळ नियोजनामुळे मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झाला. हा सरकारच्या गलथान व खोटारड्या व्यवस्थेने केलेला खुन आहे. शहिद काकासाहेब शिंदे यांच्या आत्महत्या प्रकरणी… आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यावर भा. द. वी. कलम ३०४, ३०६ खुनाचा गुन्हा व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे . असे हि त्यांनी सांगितले .
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सरन्याधीश भूषण गवईंचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारकडून अपमान, आंबेडकरी विचारांचे असल्याने अपमान केला का? : नाना पटोले

सरन्यायाधिशांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर राज्य सरकार काय कारवाई करणार. राज्य...

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया २० मे पासून सुरू

पदविका अभ्यासक्रम नोकरी व उद्योगासाठी उपयुक्त पर्याय; अधिकाधिक विद्यार्थ्यांनी...