शेती उद्योगातील स्टार्टअपचे श्रेय डॉ. रघुनाथ माशेलकर यांना – देवेंद्र फडणवीस

Date:

पुणे- देशातील तरुणाईच्या कल्पनाशक्तीचा वापर करून रोजगार निर्मिती करण्यासाठीची राज्याची स्टार्टअप पॉलिसी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली. मागील चार वर्षात देशातील सर्वाधीक स्टार्टअप, विशेषत: शेती उद्योग व विपणनातील सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात सुरू झाले. यामुळे आपल्याकडील तरुण शेतकरी शेतीमाल जागतिक पातळीवर स्पर्धा करू लागला आहे. याचे सर्व श्रेय डॉ. रघुनाथ माशेलकर यांना जाते, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. महापौर मुरलीधर मोहोळ अध्यक्ष असलेल्या कोथरूड येथील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा अटल संस्कृती गौरव पुरस्कार पदमविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेता गणेश बिडकर, गायिका पद्मजा फेणाणी, वैशाली माशेलकरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

विधीमंडळाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, की भारत देशाला पडलेले सुंदर स्वप्न म्हणजे अटलजी. देशातील शास्त्रज्ञांनी अणुसज्जता अगोदरच केली होती. परंतू अमेरिकेच्या दबावाखाली अणु चाचणी केली नव्हती. आपल्याशिवाय जगाचे चालू शकणार नाही, हे ओळखणार्‍या अटलजींनी अणुचाचणी केली. डॉ. माशेलकरांनी विज्ञानाचा वापर मानवजातीसाठी कसा करता येउ शकतो, यासाठी त्यांनी महात्मा गांधीजीच्या शाश्‍वत विचाराची कास धरली. देशातील महत्वाच्या निर्णयाकरिता माशेलकर कमिटी स्थापन करावी लागली, याचे कारण त्यांची जबाबदारीने काम करायची वृत्ती. यामुळे अटलजींनी देखिल त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात डॉ. माशेलकर यांच्यावर विश्‍वास टाकला होता. देशातील तरुणाईकडे प्रचंड कल्पनाशक्ती आहे. या कल्पनाशक्तीला व्यासपीठ उपलब्ध करून दिले, तर पुढच्या काळात रोजगार स्टार्टअपच्या माध्यमातून होईल. राज्याने डॉ. माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली देशातील पहिली स्टार्टअप पॉलिसी तयार झाली. त्यांच्या स्टार्ट पॉलिसीमुळे राज्यात सर्वात अधिक स्टार्टअप सुरू झाले. ऍग्री बिझनेसमध्ये सर्वाधिक स्टार्टअप झाले. आज शेतातील माल थेट जागतिक पातळीवर जाउ लागला, सर्वाधीक रोजगार निर्माण झाला याचे श्रेय डॉ. माशेलकर यांच्याकडे जाते.

डॉ. माशेलकर यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, आयुष्यात अनेक पारितोषिक मिळाली आहेत. परंतु हा अटल पुरस्कार माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आहे. युगपुरूष अटलजींच्या नावाने मिळालेल्या पुरस्काराचे महत्वच वेगळे आहे. अटलजींचे प्रेरणादायी नेतृत्व, त्यांचे मार्गदर्शन मला सीएसआयआरमध्ये असताना मिळाले. सीएसआयआर चे नेतृत्व करताना त्यांनी मला स्वातंत्र्य दिले, पाठींबा दिला. त्यामुळे सीएसआयआर संस्था जगामध्ये दहा क्रमांकांमध्ये आलो. यावेळी डॉ. माशेलकर यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी यांच्या आठवणी सांगितल्या. परंतू शिक्षकांना प्रतिष्ठा देण्याबाबत त्यांचे स्वप्न अपुर्ण राहीले, ते पुर्ण करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

 महापौर मुरलीधर मोहोळ हे सर्व विषयांना चांगला न्याय देतात. कोरोना काळातही टीका होत असताना संयमाने त्यांनी परिस्थिती हाताळली. मागील तीन वर्षांपासून ते उत्तमोत्तम व्यक्तिमत्वांना हा पुरस्कार देतात असे चंद्रकांत पाटील या वेळी बोलताना म्हणाले.

जगात काहीही घडले तरी पुणेकर त्याचे नाते पुण्याशी जोडतो – गिरीष बापट


गिरीष बापट म्हणाले, जगात काहीही घडले तरी आम्ही त्याचे नाते पुण्याशी जोडतो. बायडेन अध्यक्ष झाले, तर म्हणतात ते पुण्याचेच होते, पुर्वीचे भिडे, इंदिरा गांधी येथील हुजूरपागा शाळेत शिकल्याचे सांगतात. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले , त्यांचे काका पुण्यातच राहातात, असे पुणेकर आहेत, डॉ. माशेलकर हे गोव्याचे असले तरी त्यांची नाळ पुण्याशी जोडले आहे. त्यांच्या हातून उत्तमोत्तम कार्य घडेल, ही शुभेच्छा.

उपस्थितांचे स्वागत मुरलीधर मोहोळ, मोनिका मोहोळ, सुनील महाजन यांनी केले. सुनील महाजन यांनी आभार मानले. भार्गवी चिरमुले आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघ यांचा या वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार सोहोळ्यानंतर अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितांवर आधारित गीत नया गाता हूँ हा गीत, संगीत आणि नृत्यावर आधारित दृक-श्राव्य कार्यक्रम झाला. संवाद पुणे निर्मित या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी अटलजींच्या रचना तर अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांनी नृत्यरचना सादर केल्या. नृत्य दिग्दर्शन निकिता मोघे यांचे होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जठार, नाईक,भेंडे, कोल्हे,कर्जतकर आणि प्रज्ञा सातवांना भाजपची उमेदवारी

मुंबई:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय...

लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करा

महिन्याभरात लोकार्पणासाठी सज्ज व्हावे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश. मुंबई...

इंडिगो-एअर इंडियाने म्हटले – विमानसेवा बंद होण्याच्या मार्गावर

नवी दिल्ली-आगामी काळात विमान प्रवास महाग होऊ शकतो, कारण...

मारुतीचा चौथ्या तिमाहीत नफा 6% नी घटला

मुंबई-ऑटोमोबाइल कंपनी मारुति सुझुकी इंडियाने आर्थिक वर्ष 2025-26 च्या...