‘माझ्या आत्महत्येला ठाकरे सरकार जबाबदार’, एसटी कंडक्टरने गळफास घेत संपवली जीवनयात्रा

Date:

जळगाव-दिवाळी सणाच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशात आणखी एका एसटी महामंडळाच्या कंडक्टरने आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. ‘माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईट नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरने आपले जीवन संपवले.

जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले आणि एस मंडळात कंडक्टर असलेल्या मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

मनोज चौधरी यांनी आत्महत्येपूर्वी एक सुसाईट नोट लिहून ठेवली. ”एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. यास जबाबदार एसटी महामंडळातील कार्यपद्धती व आपले मराठी माणसाचे ठाकरे सरकार आहे. (शिवसेना) माझ्या घरच्यांचा यात काहीही संबंध नाही. संघटनांनी माझ्या पीएफ आणि एलआयसी वीमा हा माझ्या कुटुंबाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा” असा मजकूर मनोज चौधरी यांनी चिठ्ठीत लिहिला आहे.

एसटी मंडळामध्ये गेले तीन चार महिने पगार मिळत नसल्याने मनोज कर्जबाजारी झाला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती मयत मनोज चौधरीच्या वडिलांनी दिली आहे.

रत्नागिरी एसटी महामंडळाच्या बस आगारात एका बस कंडक्टरने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पांडुरंग संभाजीराव गडदे असे या बस वाहकाचे नाव आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राजकारण कमी करा अन विकास कामांवर जास्त लक्ष द्या:मंत्री माधुरी मिसाळांनी महापलिकेच्या विकास प्रकल्पांना गती देण्याचे दिले आदेश

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पुणे महानगरपालिकेच्या विकास प्रकल्पांचा...

मंत्री नीतेश राणेंना 1 महिना कारावासाची शिक्षा अन् 1 लाखाचा दंड

कॉंग्रेसमध्ये असताना केलेल्या आक्रमक आंदोलनाची शिक्षा मुंबई-सिंधुदुर्ग जिल्हा व...

मंत्री प्रताप सरनाईक ठाम,म्हणाले, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी यायलाच हवं

मुंबई- राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी राज्यातील...

भोंदूबाबा धिरेंद्र शास्त्री छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करत असताना मुख्यमंत्री, गडकरी व मोहन भागवत गप्प का ?- अरविंद शिंदेंचा सवाल

पुणे- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल...