पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात आंदोलन
पुणे-आयएनएस विक्रांत जहाजाच्या निधीचा अपहार केल्याचा ठपका ठेऊन किरीट सोमय्यांंना या तथाकथित अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. आज शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली , सोमैय्या असे नाव दिलेल्या एका पुतळ्याला प्रतीकात्मक फाशी देऊन या अपहार प्रकरणी निषेध करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी शिवसैनिक उप विधानसभा प्रमुख उत्तम भुजबळ युवासेना विधानसभा अधिकारी सनी गवते, रमेश शिरसागर सत्यजित कवडे, अक्षय फुलसुंदर, विभाग प्रमुख अनिल दामजी, राजेश मोरे, संतोष सोनवणे, राजेंद्र शहा, मकरंद केदारी, युवराज पारीख, नितीन नगडे, नंदु येवले, नितीन रावळेकर, अनंत घरत, सुशील पवार , विजय नायर, मयूर झेंडे, जितेंद्र जठार, मुरली विलकर, सचिन घोलप, सचिन खुडे, शंकर साठे, विजय पालवे, गजानन देशमुख, राहुल चिंदम, अतिश अनारसे, नितीन थोपटे, शुभम गायकवाड, मुकुंद लालबिगे, अजय परदेशी, नितीन दरेकर ,परवेश राव, अमोल यादव, स्मिता पवार, रोहिणी म्हेत्रे, पद्मा सोरटे ,धनश्री बोराडे, रोहिणी कोल्हाळ, देविका भोसरे अनेक शिवसैनिक उपस्थित होते .
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विक्रांत जहाज स्मारकाच्या बांधणीच्या नावावर करोडो रूपये जमा केले. सरकार दरबारी ते कुठेही जमा न करता या रकमेचा भ्रष्टाचार केला. शिवसेने नेते खा. संजय राउत यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मिळविली असता राजभवनात हे पैसे जमा केले नाही. अशी माहिती मिळाली. गेले दोन दिवस किरीट सोमय्या मिडीयाच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळत आहे. असा आरोप यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांनी केला .

