उर्जा बचत प्रकल्पासाठी ‘महाप्रित’चा पुणे महानगरपालिकेसोबत सामंजस्य करार

Date:

पुणे, दि. 7: महात्मा फुले मागासवर्ग विकास महामहामंडळाअंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महात्मा फुले नविनीकरणीय उर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादीत (महाप्रित) या सहयोगी कंपनीने आज पुणे महानगरपालिकेसोबत ऊर्जेची व उर्जा खर्चाची बचत, धोरण, यासाठी उपाययोजना करण्यासाठीच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला. या सामंजस्य करारावर ‘महाप्रित’चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक बिपिन श्रीमाळी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

स्वयंरोजगार निर्मितीसंदर्भात दुर्बल घटकांच्या विकासाच्या दृष्टीकोनातून उर्जा वापराच्या खर्चात बचत करण्याची योजना या प्रकल्पामध्ये आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि ‘शून्य कार्बन’ उद्दिष्ट गाठण्यासाठी पारंपारिक उर्जेच्या जागी सौर उर्जा निर्मिती हे देखील या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

‘महाप्रित’चा हा कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेसोबत झालेला हा राज्यातील पहिल्याच संयुक्त उपक्रमाचा करार आहे. या उपक्रमाचा पुणे शहरासह समाजातील दुर्बल घटकांनाही उपयोग होणार आहे. स्थानिक नवोद्योजकांपैकी (स्टार्ट अप आंत्रप्र्यूनर्स) पात्र आणि कल्पक नवोद्योगांची निवड करुन त्यांना प्रोत्साहन व सहाय्य देण्याचीही या प्रकल्पाची कल्पना आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी तसेच ऊर्जा खर्चात बचत करण्यासाठी राज्यातील इतर महानगरपालिकांमध्येही असे प्रकल्प हाती घेण्यास त्यामुळे चालना मिळेल.

यावेळी बिपीन श्रीमाळी म्हणाले, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जा बचतीद्वारे भविष्यात पुणे महानगरपालिकेच्या विद्युत देयकांच्या खर्चातही बचत होईल.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, मुख्य अभियंता (विद्युत) श्रीनिवास कुंदल, अधिक्षक अभियंता (विद्युत) मनीषा शेकटकर, ‘महाप्रित’चे संचालक (संचलन) विजयकुमार काळम पाटील, कार्यकारी संचालक (प्रशासन) प्रशांत गेडाम, मुख्य महाव्यवस्थापक श्यामसुंदर सोनी, सतीश चवरे, गणेश चौधरी, विरेंद्र जाधवराव, पंकज शहा, प्रसाद दहापुते आणि जनसंपर्क अधिकारी मिलिंद अवताडे उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...