पुणे-घरगुती वीज बिल युनिटच्या दरामध्ये करण्यात आलेल्या वाढीच्या विरोधात स्वराज्य निर्माण सेनेच्यावतीने रास्ता पेठमधील महावितरणच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर “ धरणे आंदोलन “ करण्यात आले . महाराष्ट्रामध्ये युनिटच्या दरामध्ये वाढ करण्यात आलेली आहे . १०० युनिटला तीन रुपये तसेच पुढील १०० ते ३०० युनिटला ६ रुपये ७३ पैसे , ५००ते १००० युनिटला ११ रुपये व त्यापुढील युनिटला १२ रुपये ४८ पैसे इंधन भार इतर भार , वाहन भार डिपॉसिट असे मिळून एक मोठी रक्कम गोर गरिबांच्या खिशातून उकळण्याचे काम आपली महावितरण व महाराष्ट्र सरकार करीत आहे . या दरवाढीला स्वराज्य निर्माण सेनेचा तीव्र विरोध आहे . असे स्वराज्य निर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नूभाई कागडा यांनी सांगितलॆ .
यावेळी स्वराज्य निर्माण सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मन्नूभाई कागडा यांनी मागणी केली कि , घरगुती लाईट बिल प्रति युनिट तीन रुपये आकारले जातात आहे तेच दोन रुपये किंवा तीन रुपये कायमस्वरूपी करण्यात यावे जर एखाद्यानी २०० , ३०० , ४०० , ५०० , १००० पर्यंत घरामध्ये वापर केला तर त्याला तीन रुपये प्रमाणे प्रति युनिट बिल देण्यात यावे दरमहा इतर भार , इंधन भार , वाहन भार , डिपॉझिट व अन्य भर जे मागितले जातात ते कुठेतरी रोखले पाहिजेत . अशी मागणी करण्यात आली .