पुणे : ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स’च्या मुकूटात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. या समूहातील ‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ व्होकेशनल अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज’ (एसआयव्हीएएस) तिच्या लक्षणीय कामगिरीसाठी ‘एक्सईएल रिसर्च’तर्फे ‘बेस्ट स्कूल ऑफ इंडस्ट्रियल, इंटेरियर, फॅशन, यूजर्स एक्स्पिरीयन्स डिझाईन अँड ग्राफिक्स, मल्टीमीडिया अँड ॲनिमेशन ॲवॉर्ड’ हा प्रतिष्ठीत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
नवी दिल्लीत नुकत्याच झालेल्या ‘एशिया क्वालिटी अँड आंत्रप्रेन्युअरशिप ॲवॉर्ड्स’ या भव्य सोहळ्यात प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान यांच्या हस्ते हा पुरस्कार सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे डिजीटल मार्केटिंग संचालक सिद्धांत चोरडिया यांना प्रदान करण्यात आला.
“आमच्या समूहाची त्याच्या कामगिरीबद्दल दखल घेतली जाणे, हा खरोखरच गौरव आहे. सूर्यदत्ता ग्रुपमध्ये आम्ही सर्वजण नेहमीच गुणवत्तापूर्ण जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यास व विद्यार्थ्यांचा कल्याणकारी विकास घडवण्यास प्रयत्नशील राहतो,” अशी प्रतिक्रिया सिद्धांत चोरडिया यांनी यावेळी व्यक्त केली.