Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’चा (एसआयएफटी) ‘बेस्ट फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ पुरस्काराने गौरव

Date:

पुणे : पुण्यातील प्रतिष्ठित व आघाडीची फॅशन व डिझायनिंग इन्स्टिट्यूट असलेल्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीला (एसआयएफटी) नुकतेच नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स वॉर्ड्स २०१७ या पुरस्कार सोहळ्यात बेस्ट फॅशन डिझायनिंग इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. नवी दिल्लीत शांग्रिलाज इरॉस हॉटेलमध्ये हा शानदार समारंभ झाला. नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स वॉर्ड्स या पुरस्कारांचे आयोजन प्रॅक्सिस मीडियातर्फे करण्यात आले. शिक्षण क्षेत्रातील सर्वोत्कृष्टतेला दिमाखदार शैलीने गौरवत प्रोत्साहन देणे, हा त्यामागील हेतू होता. या सोहळ्याला शिक्षण क्षेत्रातील नामवंतांची उपस्थिती होती.

 

सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी ज्येष्ठ राजकीय नेते व संसद सदस्य अमर सिंग आणि केंद्रीय मानवी साधनसंपत्ती विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंगचे अध्यक्ष प्रा. चंद्रभूषण शर्मा यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. प्रा. डॉ. चोरडिया यांच्यासाठी हा खरोखरच अभिमानाचा क्षण होता.

 

यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना प्रा. डॉ. चोरडिया म्हणाले, की आमच्या विद्यार्थ्यांनी कंपनी जगतात खात्रीशीर यश मिळवावे, या हेतूने आम्ही त्यांना किफायती शुल्कात दर्जेदार शिक्षण देऊन कल्याणकारी विकास साधतो आणि याकामी सर्वोत्कृष्टता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. फॅशन जगतात उज्ज्वल भवितव्यासाठी लाभदायी करिअर घडवण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना अनोख्या संधीही मिळवून देतो.

 

एसआयएफटीतर्फे वर्ष २०१० पासून फॅशन डिझायनिंग विषयातील बॅचलर्स व मास्टर्स डिग्री, तसेच सर्टिफिकेट कोर्सेस व डव्हान्स्ड कोर्सेस असे अभ्यासक्रम राबवले जातात. इतकेच नव्हे, तर ही संस्था आपल्या विद्यार्थ्यांना अनेक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी (सीएसआर) उपक्रमांतही सहभागी करुन घेते. गरजू महिलांना फॅशन डिझायनिंगचे मोफत प्रशिक्षण देण्याचा उपक्रम हा त्यापैकीच एक उल्लेखनीय. गेल्या सात वर्षांत संस्थेने ३००० हून अधिक महिलांना या मार्गाने यशस्वी प्रशिक्षीत केले आहे.

 

नॅशनल एज्युकेशन एक्सलन्स वॉर्ड्सच्या पुरस्कारार्थींची निवड एका स्वतंत्र परीक्षक मंडळातर्फे केली जाते. विजेत्यांच्या निवडीसाठी पात्रता व व्यावसायिक अनुभव, पायाभूत सुविधा व सोयी, बाजारपेठेतील उपस्थिती व स्पर्धा, प्रगती व नफाक्षमता, गुणवत्ता व कार्यात्मक उत्कृष्टता, वित्तीय व व्यावसायिक कौशल्य, सेवांमधील अभिनवता व नावीन्य, अस्सलता व कल्पकता, शाश्वतता व पर्यावरणात्मक सजगता, नोकरी व प्रभावाचे सुप्त सामर्थ्य, ग्राहक व उद्योगांचा प्रतिसाद, तंत्रज्ञान व कल यांचा वापर, जोखीम व आघात पचवण्यासाठी केलेले प्रयत्न, पूर्वी मिळालेले पुरस्कार व कामगिरी असे ठळक निकष वापरले जातात.

 

यंदा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिलेल्या नामवंतांमध्ये उत्तर प्रदेशचे व्यापारी शिक्षण, कौशल्य विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री चेतन चौहान, ज्येष्ठ राजकीय नेते व संसद सदस्य अमर सिंग, माजी क्रिकेटपटू नयन मोंगिया, राजकीय नेत्या व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी, एनसीईआरटीचे शिक्षण अधिष्ठाता प्रा. सरोज यादव, केंद्रीय मानवी साधनसंपत्ती विकास मंत्रालयाच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ओपन स्कूलिंगचे अध्यक्ष प्रा. चंद्रभूषण शर्मा आदींचा समावेश होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्याला 1 लाखाची लाच घेताना अटक

पुणे:पिंपरी महापालिकेत कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी करीत असलेल्यास...

“भारत गौरव ट्रेन – छत्रपती शिवाजी महाराज सर्किट” ९ जून पासून

पर्यटकांनी ऐतिहासिक़ पर्यटनाचा लाभ घ्यावा- पर्यटनमंत्री शंभूराज देसाईमुंबई, दि....

लोकशाही, संविधान व महाराष्ट्र धर्म वाचवण्याच्या लढाईत काँग्रेस शिवसेनेबरोबर: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मातोश्रीवर घेतली शिवसेना पक्ष...