तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत जिरी वेस्ली, रिकार्डस बेरँकीस यांचा उपांत्य फेरीत प्रवेश

Date:

  • दुहेरीत भारताच्या रामकुमार रामनाथन , पुरव राजा जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश 
  • ख्रिस्तोफर रुंगकॅट , आंद्रे गोरसन  जोडीचा दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश
 
पुणे-  महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस असोसिएशन (एमएसएलटीए) च्या वतीने व महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने आयोजित आयोजित तिसऱ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत भारताच्या रामकुमार रामनाथन , पुरव राजा या जोडीने वाईल्डकार्ड प्राप्त जोडी भारताचा लिअँडर पेस व ऑस्ट्रेलियाचा मॅथ्यू एबडन यांचा 6-2, 6-1 असा एकतर्फी लढतीत पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. 
 
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत 2 तास 30 मिनिट चाललेल्या सामन्यात 26 वर्षीय जागतिक क्रमांक 107 असलेल्या झेकियाच्या  जिरी वेस्ली याने  बेलारूसच्या 25 वर्षीय जागकित क्रमांक152 असलेल्या  इल्या इवाश्का याचा 2-6, 6-1, 7-6(11) असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.  पहिला सेट इल्या इवाश्काने 6-2 असा सहज जिंकत जिरीवर दबाव निर्माण केला मात्र दुस-या सेटमध्ये सुरूवातीपासुनच आक्रमक सुरूवात करत दुसरा सेट 6-1असा सहज जिंकत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली. तिसरा सेट संघर्षपुर्ण झाला. दोन्ही खेळाडूंना सामन्यातील आपली पकड पक्की ठेवत तिसरा सेट बोराव्या गेमपर्यंत 6-6 असा बरोबरीत राखला व सामना टायब्रेक झाला. टायब्रेकमध्येही दोन्ही खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. अतितटीच्या झालेला तीसरा सेट टायब्रेकमध्ये  7-6(11) असा जिंकत  जिरी वेस्ली याने  2-6, 6-1, 7-6(11)  असा सामना जिंकत उपांत्य फेरीत प्रवेश केला. 
 
दुस-या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत लिथुआनियाच्या दुस-या मानांकीत रिकार्डस बेरँकीस याने जपानच्या पाचव्या मानांकीत  यूची सुगीता  याचा  4-6, 7-6(4), 6-2  असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. पहिला सेट जपानच्या 31 वर्षीय जागतिक क्रमांक 86 असलेल्या पाचव्या मानांकीत यूची सुगीता याने 6-4असा जिंकत सामन्यात आघाडी घतली. दुसरा सेट संघर्षपुर्ण लढतीत  लिथुआनियाच्या 29 वर्षीय जागतिक क्रमांक 73 असलेल्या दुस-या मानांकीत  रिकार्डस बेरँकीस याने टायब्रेकमध्ये  7-6(4)  असा जिंकत सामन्यात 1-1 अशी आघाडी घेतली. तिस-या सेटमध्ये  रिकार्डस बेरँकीसने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत तिसरा सेट  6-2 असा सहज जिंकत सामन्यात  4-6, 7-6(4), 6-2 असा विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. 
 
दुहेरी गटात उपांत्य फेरीच्या लढतीत इंडोनेशियाच्या ख्रिस्तोफर रुंगकॅट याने स्वीडनच्या आंद्रे गोरसन याच्या साथीत मोनाकोच्या रोमेन अर्नेओडो व जर्मनीच्याआंद्रे बेगेमन यांचा 6-4, 7-6(1) असा टायब्रेकमध्ये पराभव करत दुहेरीच्या अंतीम फेरीत प्रवेश केला. 
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल-  एकेरी गट-उपांत्यपुर्व फेरी  

जिरी वेस्ली (झेकिया) वि.वि  इल्या इवाश्का (बेलारूस) 2-6, 6-1, 7-6(11)

रिकार्डस बेरँकीस (लिथुआनिया)(2)  वि.वि    यूची सुगीता (जपान)(5)  4-6, 7-6(4), 6-2

 
दुहेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
रामकुमार रामनाथन (भारत) / पुरव राजा (भारत) वि.वि लिअँडर पेस (भारत) / मॅथ्यू एबडन (ऑस्ट्रेलिया) 6-2, 6-1
 
दुहेरी गट- उपांत्य फेरी
ख्रिस्तोफर रुंगकॅट (इंडोनेशिया) / आंद्रे गोरसन (स्वीडन) वि.वि रोमेन अर्नेओडो (मोनाको) / आंद्रे बेगेमन (जर्मनी) 6-4, 7-6(1)
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश

महिला आयोगाच्या विशेष उपक्रमाचा उरुळीकांचन येथून शुभारंभ मुंबई, दि. ११...

MPSC नोकर भरतीचा घोटाळा व्यापमपेक्षा मोठा, ऑनलाईन परीक्षा पद्धत तातडीने रद्द करा: हर्षवर्धन सपकाळ

MPSC च्या ऑनलाईन परीक्षा पद्धतीवर विद्यार्थ्यांना विश्वास नाही, ऑफलाईन...

प्रशासकीय सेवेत समाज व देशहिताची ध्येय धोरणंआखावीत

तेलंगणाचे डीजीपी महेश भागवत यांचे मतपुणे: डब्ल्यूपीयूत यूपीएससीच्या यशस्वितांचा...

वडकी नाला व कदमवाकवस्ती येथे दिंडीप्रमुखांचा सत्कार; वारकऱ्यांसाठी फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था

वारीच्या वाटेवर भक्तीचा विसावा; माऊली-तुकोबांच्या पालखी सोहळ्यांचे ‘पीएमआरडीए’कडून भावपूर्ण...