इन्फोसिस आंतर आयटी टी-२० क्रिकेट करंडक स्पर्धेत टीसीएस संघाला विजेतेपद

Date:

पुणे: महाराष्ट्र क्रिडा यांच्या तर्फे आयोजित व इन्फोसिस रिक्रिएशन क्लब पुरस्कृत  इन्फोसिस  आंतर आयटी टी-20क्रिकेट स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावले.

हिंजवडी फेज 2 येथील इन्फोसिस क्रिकेट मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत विजेतेपदासाठीच्या लढतीत मयंक जासोरेच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीसीएस संघाने इन्फोसिस संघाचा 1 धावेने पराभव करत विजेतेपद संपादन केले. अतितटीच्या झालेल्या लढतीत पहिल्यांदा खेळताना  मयंक जासोरेच्या 43 व शंतनू नाडकर्णीच्या  21 धावांसह टीसीएस संघाने  20 षटकात 9 बाद 123 धावा केल्या. 123 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना  इन्फोसिस संघाने कडवी झुंज दिली मात्र यश मिळाले नाही. आशय पालकर 22 व संजय पुरोहितने 21 धावांसह  इन्फोसिस संघाने 20 षटकात 9 बाद 122 धावा केल्या. टीसीएस संघाच्या सागर दुबे व मयंक जासोरे यांनी प्रत्येकी 3 गडी बाद करून संघाला विजय मिळवून दिला. मयंक जासोरे सामनावीर ठरला.

स्पर्धेतील विजेत्या टीसीएस संघाला 50 हजार रूपये व करंडक तर उपविजेत्या इन्फोसिस संघाला 40 हजार रूपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितेषीक वितरण  इन्फोसिसचे डीसी हेड व एसएपीचे उपाध्यक्ष आणि डिलिव्हरी हेड  प्रवीण कुलकर्णी आणि इन्फोसिसचे आयआरसी हेड आनंत बारटक्के यांच्या हस्ते करण्यात आले. यावाळी  महाराष्ट्र क्रिडाचे अश्विन पन्हाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- अंतिम फेरी
टीसीएस- 20 षटकात 9 बाद 123 धावा(मयंक जासोरे 43 (34), शंतनू नाडकर्णी  21 (22), शारॉन थॉमसन 2/26 , रवी थापलीयाल 2/21 , आनंद कोंडा 2/30) वि.वि इन्फोसिस- 20 षटकात 9 बाद 122 धावा(आशय पालकर 22 (33), संजय पुरोहित 21 (27), सागर दुबे 3/27 , मयंक जासोरे 3/23)  सामनावीर- मयंक जासोरे
टीसीएस संघाने 1 धावेने सामना जिंकला.

इतर पारितोषिके
सर्वोत्कृष्ट गोलंदाज- सागर दुबे(टीसीएस, 6 सामन्यात 13 गडी बाद)
सर्वोत्कृष्ट फलंदाज- सौरभ देवरे(सिमेन्स, 5 सामन्यात 196 धावा)
मालिकावीर- आशय पालकर(इन्फोसिस, 6 सामन्यात 165 धावा, 6 गडी बाद)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या यादीत देवेंद्र फडणवीस तिसऱ्या क्रमांकावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी...

जावयांना सासरकडील नातेवाईकांकडून मारहाण:पुणे शहरातील दोन घटना, एकाचे नाक फ्रॅक्चर

पुणे -शहरात सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन स्वतंत्र...

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३...

 ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘आषाढी पंढरपूर सायकल वारीत 4000 हून अधिक सायकलस्वार सहभागी

मुंबई, 13 जुलै 2026 फिट इंडियाच्या 81 व्या पर्वातील वैशिष्ट्यपूर्ण...