माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

Date:

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३ जुलै) अल्पशा आजाराने निधन झाले. ते जुन्या बोपोडी विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा प्रतिनिधी होते. त्यांच्या पार्थिवावर संगमवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रामभाऊ मोझे हे पुणे जिल्ह्यातील एक प्रभावी नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांनी १९८०, १९८५ आणि १९९० मध्ये जुन्या बोपोडी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून विजय मिळवला. त्यावेळी ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते विश्वासू समर्थक मानले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर त्यांनी पवारांसोबत काम केले, तर २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येरवडा, बालेवाडी आणि संगमवाडी परिसरातील स्थानिक राजकारण आणि विकासात त्यांचा मोठा प्रभाव होता.

राजकारणासोबतच शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. सामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे व्यावसायिक शिक्षण मिळावे, या उद्देशाने त्यांनी ‘गेनबा सोपानराव मोझे ट्रस्ट’ची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी प्राथमिक शाळांपासून ते अभियांत्रिकी, फार्मसी आणि इतर विविध तंत्रशिक्षण देणाऱ्या नामांकित व्यावसायिक शिक्षण संस्थांचे जाळे पुण्यात उभे केले. येरवडा, बालेवाडी आणि वाघोली परिसरात त्यांच्या संस्था आजही कार्यरत आहेत. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारा एक कर्तव्यदक्ष नेता आणि शिक्षणमहर्षी हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ नागरिकाची १०.७४ कोटींची फसवणूक; फरार आरोपी सायबर पोलिसांच्या जाळ्यात

सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून घातली होती भीती; आरोपी रोहन...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशा पथकांना सरावासाठी जागा व परवानगी उपलब्ध करून द्यावी – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे-पुण्याची ऐतिहासिक व वैभवशाली गणेशोत्सव परंपरा जपणाऱ्या ढोल-ताशा पथकांना...

लघु नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी पुण्यात प्रादेशिक कार्यशाळा

‘Small River Rejuvenation Framework’वर तज्ज्ञांचे मंथन; आयुक्त नवल किशोर...

कात्रज-कोंढवा रस्ता, गंगाधाम उड्डाणपूल आणि नवले पुलाजवळील सर्व्हिस रोडच्या कामांना गती

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची प्रत्यक्ष पाहणी; भूसंपादन,...