जावयांना सासरकडील नातेवाईकांकडून मारहाण:पुणे शहरातील दोन घटना, एकाचे नाक फ्रॅक्चर

Date:

पुणे -शहरात सासरकडील नातेवाईकांकडून जावयांना मारहाण करण्याच्या दोन स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणी बिबवेवाडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.बिबवेवाडी परिसरात घडलेल्या पहिल्या घटनेत, पत्नीच्या घरी मोबाईल घेण्यासाठी गेलेल्या एका ३८ वर्षीय जावयाला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी सासू, पत्नी आणि इतर नातेवाईकांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

फिर्यादीनुसार, १२ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास तक्रारदार जावई पत्नीच्या माहेरी मोबाईल घेण्यासाठी गेले होते. त्यांनी पत्नीकडे मोबाईल मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. यावेळी पत्नी, सासू आणि नातेवाईकांनी त्यांना लाकडी दांडके व स्टंपने मारहाण केली.या प्रकरणी जावयाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, हवालदार कर्चे पुढील तपास करत आहेत.
कोंढवा परिसरात घडलेल्या दुसऱ्या घटनेत, पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरकडील नातेवाईकांनी मारहाण केली. या मारहाणीत मेहुण्याने नाकावर ठोसा मारल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे.तक्रारदार जावई कोंढव्यातील मीठानगर परिसरात पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेले होते. तेथून घरी परतत असताना मेहुण्याने त्यांना मोबाईलवर संपर्क साधून शिवीगाळ केली. याचा जाब विचारण्यासाठी तक्रारदार पुन्हा तिथे परतले असता, सासरकडील नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली.या प्रकरणी तिघांविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक एस. खोपडे अधिक तपास करत आहेत.

पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेलेल्या जावयाला सासरकडील नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना कोंढवा परिसरात घडली. मेहुण्याने नाकावर ठोसा मारल्याने जावयाच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे कोंढव्यातील मीठानगर परिसरात माहेरी गेलेली पत्नी आणि मुलाला भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर तक्रारदार जावई तेथून घरी निघाला त्या वेळी मेहुण्याने तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शिवीगाळ केल्यानंतर मेहुण्याला जाब विचारण्यासाठी तक्रारदार पुन्हा तेथे गेला. तेव्हा सासरकडील नातेवाईकांनी त्याला मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक एस खोपडे तपास करत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झेटवर्क मॅन्युफॅक्चरिंगला IPO साठी सेबीची मंजुरी

12 हजार कोटींच्या ऑर्डर बुकसह बाजारात उतरणार; ऊर्जा, संरक्षण,...

२२ जुलैपर्यंत पाणीकपात रद्द; परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे | पुणेकरांसाठी दिलासादायक निर्णय घेत महापौर मंजुषा नागपुरे...

पेणच्या गणेशमूर्ती कलाकारांच्या व्यथेची आ. डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून दखल

२०२१ प्रमाणे विशेष मदत पॅकेजची मागणी; पूरग्रस्त मूर्तिकारांना तातडीने...