‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘आषाढी पंढरपूर सायकल वारीत 4000 हून अधिक सायकलस्वार सहभागी

Date:

मुंबई, 13 जुलै 2026

फिट इंडियाच्या 81 व्या पर्वातील वैशिष्ट्यपूर्ण अभियानाअंतर्गत ‘संडेज ऑन सायकल’ मोहिम, ‘आषाढी- पंढरपूर सायकल वारी 2026 मध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 4000 हून अधिक सायकलपटूंनी सहभाग घेतला आहे. ‘आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या,मुंबई प्रादेशिक केंद्रातर्फे रविवारी पंढरपूर शहरात या भव्य सायकल रॅलीच्या रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या सायकल रॅलीला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या मुंबई प्रादेशिक केंद्राचे प्रादेशिक संचालक पांडुरंग चाटे (आयआरएस) यांच्या हस्ते औपचारिकपणे हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

आषाढी- पंढरपूर सायकल वारी असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केलेल्या या उपक्रमात, शतकानुशतके चालत आलेल्या वारकरी परंपरेपासून प्रेरित होऊन एका अनोख्या उत्सवात सायकलस्वार, फिटनेसप्रेमी आणि विठ्ठल भक्त एकत्र आले.

महाराष्ट्र आणि कर्नाटकातील 140 हून अधिक सायकलिंग क्लब मधील सदस्य सहभागी या सोहळ्यात सामील झाले आहेत, ज्यामुळे आषाढी वारीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या सर्वात मोठ्या सायकलिंग मेळाव्यांपैकी हा एक ठरला.

‘संडेज ऑन सायकल’च्या या पर्वाचा उद्देश नियमित शारीरिक हालचालींचे महत्त्व, वाहतुकीचे एक पर्यावरणपूरक साधन म्हणून सायकलिंग करणे, रस्ते सुरक्षा, पर्यावरण संवर्धन आणि सामुदायिक सहभाग यांना प्रोत्साहन देणे हा होता.तंदुरुस्ती, भक्ती आणि भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा उत्सव साजरा करणारी ‘आषाढी -पंढरपूर सायकल वारी 2026 ही खेळ, तंदुरुस्ती आणि वारसा हे एकत्र येऊन निरोगी जीवनशैलीसाठी कसे प्रेरणा देऊ शकतात,पर्यावरणीय जबाबदारीला प्रोत्साहन देऊ शकतात आणि सामाजिक सलोखा मजबूत करू शकतात याचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३...

लोणावळा येथील INS शिवाजी येथे ‘ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026’ ची सांगता

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाने विजेतेपदाचा करंडक जिंकून पटकावले...