महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांसाठी सैन्य अग्निवीर भरती मेळावा, 20 जुलै, पासून मुंब्रा, ठाणे येथे .

Date:

मुंबई-

नंदुरबार, धुळे, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी, येत्या 20 जुलै 2026 पासून मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, मुंब्रा, ठाणे येथे सैन्य अग्निवीर भरती मेळावा सुरू होणार असल्याचे, सैन्य भरती कार्यालय (एआरओ), मुंबई विभाग यांनी जाहीर केले आहे

अग्निपथ योजनेअंतर्गत आयोजित ऑनलाइन सामायिक प्रवेश परीक्षा (CEE) यशस्वीरित्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित केला जाणार आहे. ऑनलाइन सामायिक प्रवेशपरीक्षेचा (CEE)  निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच, निवड झालेल्या उमेदवारांना शारीरिक योग्यता चाचणी (PFT), शारीरिक मापन चाचणी (PMT), शारीरिक कार्यक्षमतेशी संबंधित चाचण्या, वैद्यकीय तपासणी आणि मेळाव्याच्या इतर प्रक्रियांसाठी प्रवेशपत्रे/मुलाखत पत्र ऑनलाइन जारी केली जातील.

उमेदवारांना असे सूचित  करण्यात येत आहे, की त्यांनी निकाल जाहीर होण्याबाबत आणि प्रवेशपत्र/मुलाखत पत्र उपलब्ध होण्याबाबतच्या अद्ययावत माहितीसाठी भारतीय लष्कराच्या अधिकृत भरती संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे आणि आपले नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल फोन तपासावेत. प्रवेशपत्र उपलब्ध होताच त्यांनी ते त्वरित डाउनलोड करून प्रिंट करावे आणि त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक पालन करावे.

मेळाव्यात हजर होताना होणारी कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे, शैक्षणिक प्रमाणपत्रे, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र (लागू असल्यास), चारित्र्य प्रमाणपत्र आणि प्रवेशपत्रात नमूद केलेली इतर कागदपत्रे वेळेच्या खूप आधी करून तयार ठेवली आहेत हे उमेदवारांनी सुनिश्चित करावे. 

सर्व उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे, की त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती आणि वैद्यकीय आरोग्याचे आवश्यक निकष पूर्ण करावेत आणि आपापल्या प्रवेशपत्रात नमूद केलेल्या तारखेला आणि वेळेला काटेकोरपणे उपस्थित राहावे. प्रवेशपत्रात नमूद केलेल्या तारखेव्यतिरिक्त इतर कोणत्याही तारखेला कोणत्याही उमेदवाराला भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार नाही.

 भारतीय सैन्यात भरती मिळवून देण्याचा खोटा दावा करणाऱ्या अप्रामाणिक व्यक्ती किंवा दलालांच्या जाळ्यात अडकू नये,असाही इशारा उमेदवारांना देण्यात येत आहे. भारतीय सैन्यातील भरती प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक, गुणवत्तेवर आधारित असून  पूर्णपणे संगणकीकृत आहे, तसेच ही निवड केवळ उमेदवाराची कामगिरी आणि पात्रतेच्या आधारावर केली जाते. कोणतीही व्यक्ती किंवा संस्था या निवड प्रक्रियेवर प्रभाव टाकू शकत नाही.

सैन्य भरती कार्यालय (आर्मी रिक्रूटिंग ऑफिस), मुंबई, सर्व पात्र निवड झालेल्या उमेदवारांना आवाहन करते की, त्यांनी सतर्क राहावे, ऑनलाइन सामायिक प्रवेशपरीक्षा (CEE) निकालांच्या घोषणेवर बारकाईने लक्ष ठेवावे आणि 20 जुलै 2026 पासून मौलाना अबुल कलाम आझाद स्पोर्ट्स स्टेडियम, मुंब्रा, ठाणे येथे सुरू होणाऱ्या अग्निवीर भरती  मेळाव्यात  वेळेवर सहभागी होण्यासाठी आपले प्रवेशपत्र (ऍडमिट कार्ड) त्वरित डाउनलोड करावे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

माजी आमदार रामभाऊ मोझे यांचे निधन

पुणे-माजी आमदार रामभाऊ गेनबा मोझे यांचे सोमवारी (१३...

 ‘संडेज ऑन सायकल’ या उपक्रमांतर्गत आयोजित ‘आषाढी पंढरपूर सायकल वारीत 4000 हून अधिक सायकलस्वार सहभागी

मुंबई, 13 जुलै 2026 फिट इंडियाच्या 81 व्या पर्वातील वैशिष्ट्यपूर्ण...

लोणावळा येथील INS शिवाजी येथे ‘ऑल इंडिया नौसैनिक कॅम्प 2026’ ची सांगता

मध्य प्रदेश आणि छत्तीसगड संचालनालयाने विजेतेपदाचा करंडक जिंकून पटकावले...