पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित पीवायसी चॅलेंजर करंडक 3दिवसीय वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत पहिल्या डावात धीरज फतंगरे(133धावा) याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने एमसीए संयुक्त जिल्हा संघापुढे 293 धावांचे आव्हान उभे केले आहे.
पीवायसी हिंदू जिमखाना क्रिकेट मैदानावर आजपासून सुरु झालेल्या अंतिम फेरीच्या तीन दिवसीय लढतीत पहिल्या दिवशी डेक्कन जिमखाना संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डेक्कन जिमखाना संघाने आजदिवसअखेर 90षटकात 6बाद 293धावा केल्या. यात सलामीचे फलंदाज तुषार श्रीवास्तव 44धावा, शुभांकर हार्डीकर 13 धावांवर बाद झाल्यानंतर धीरज फतंगरेने धडाकेबाज फलंदाजी करताना 195 चेंडूत 14चौकार व 7षटकारांच्या मदतीने 133 धावांची खेळी केली. धीरजला आशय पालकरने 165चेंडूत 10चौकार व 1 षटकारासह नाबाद 66 धावांची खेळी करून सुरेख साथ दिली. धीरज व आशय यांनी चौथ्या गड्यासाठी 297चेंडूत 166 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. एमसीए संयुक्त जिल्हा संघाकडून शामशुझमा काझी(74-2), तरणजित सिंग डीलन(73-2), मनोज इंगळे(53-1) यांनी सुरेख गोलंदाजी डेक्कन जिमखाना संघाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
डेक्कन जिमखाना व एमसीए संयुक्त जिल्हा संघ यांच्यातील सामन्याचा अजून दोन दिवसाचा खेळ बाकी आहे.
पहिला डाव: डेक्कन जिमखाना: 90षटकात 6बाद 293धावा(धीरज फतंगरे 133(195,14×4,7×6), आशय पालकर नाबाद 66(165,10×4,1×6), तुषार श्रीवास्तव 44(96,6×4), शुभांकर हार्डीकर 13, तरणजित सिंग डीलन 30-73-2, शामशुझमा काझी 19-74-2, मनोज इंगळे 17-53-1) वि. एमसीए संयुक्त जिल्हा संघ: