मर्सिडीज- बेंझ इंडिया मॉडेल रेंजच्या एक्स- शोरूम किंमतीत तीन टक्क्यांची वाढ करणार

Date:

  • भारतातील मर्सिडीज- बेंझ मॉडेल रेंजची एक्स- शोरूम किंमत जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून तीन टक्क्यांनी वाढणार
  • कमॉडिटीच्या किंमतीत तसेच कच्च्या मालाच्या किंमती वाढल्यामुळे जानेवारी 2020 पासून किंमतवाढ
  • मर्सिडीज- बेंझ आर्थिक सेवा आणि मूल्यवर्धित ग्राहक सेवा उपक्रमांमुळे ग्राहकांसाठी गाडी खरेदीचा अनुभव अधिक किफायतशीर होणार

 

पुणे – भारतातील सर्वात मोठी लक्झरी कार उत्पादक मर्सिडीज- बेंझ इंडियाने आज आपल्या सर्व गाड्यांच्या श्रेणीच्या किंमती वाढ करण्यात आली असून ती जानेवारी 2020 च्या पहिल्या आठवड्यापासून लागू होणार असल्याचे जाहीर केले. गाड्यांच्या किंमतीमध्ये ढोबळमानाने तीन टक्क्यांची वाढ होणार आहे. कच्च्या मालाच्या किंमती तसेच कमॉडिटीच्या किंमती वाढल्यामुळे जानेवारी 2020 पासून ही किंमतवाढ केली जाणार आहे.

मर्सिडीज- बेंझ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मार्टिन श्वेंक म्हणाले, ‘आम्ही एकंदर किंमतवाढीचे पुनरावलोकन करत असून त्यात कमॉडिटी आणि कच्च्या मालाच्या किंमतीचा समावेश आहे. यामुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. सातत्यपूर्ण व्यवसाय चालवण्यासाठी आणि ग्राहकांची ब्रँडमधील गुंतवणूक जपण्यासाठी माफक किंमतवाढीद्वारे वाढत्या किंमतीचा परिणाम सुसह्य करण्याची गरद आहे. आम्ही यातील बहुतेक खर्चाची झळ सोसत असून काही अतिरिक्त खर्च ग्राहकांपर्यत पोहोचवण्याखेरीज आमच्याकडे दुसरा पर्याय राहिलेला नाही.’

ते पुढे म्हणाले, ‘माफक किंमतवाढ झालेली असली, तरी मर्सिडीज- बेंझद्वारे स्टार अजिलिटी, विश बॉक्स, स्टार फायनान्स अशा खास बनवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण आर्थिक योजना ग्राहकांना त्यांची आवडती मर्सिडीज- बेंझ घरी आणण्यासाठी मदत करतील. या अभिनव योजना असामान्य मूल्य तसेच विनाअडथळा खरेदीचा अनुभव देणाऱ्या आहेत. त्याचप्रमाणे स्टार इझ, स्टार केयर, स्टार केयर प्लस आणि ऑन रोड असिस्टन्स अशा योजना ग्राहकांचा खरेदीचा एकंदर अनुभव आणखी उंचावतील.’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींच्या ठिय्यानंतर दिल्ली पोलिसांनी अखेर केला FIR दाखल

जंतर-मंतर आंदोलनातील कथित पॅलेट गन प्रकरण; गुन्हा ‘अज्ञात व्यक्तीं’विरुद्ध...

मराठी न येणाऱ्या १,२६८ रिक्षा-टॅक्सी चालकांना नोटीस; परिवहन विभागाची राज्यभर विशेष मोहीम

८,२१७ चालकांची तपासणी; मुंबई महानगर प्रदेशात ६०४, तर राज्याच्या...

‘एमएच १२’ ही पुण्याची ओळख कायम राहणार

वाहनांसाठी लवकरच नवी सिरीज ​पुणे: पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच...