पुणे: डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे-एमएसएलटीए आयटीएफ कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत गिरीश चौगुले, प्रसाद इंगळे, सिद्धार्थ मराठे, ईशान गोधभरले या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात ईशान गोधभरले याने सौरीश सिंगचा 6-4, 4-6, 10-8 असा तीन सेटमध्ये पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.सिद्धार्थ मराठेने निशित रहाणेचा 6-4, 6-3 असा तर, प्रसाद इंगळे याने मनन चैतन्यचा 6-3, 6-0 असा पराभव करून आगेकूच केली. गिरीश चौगुलेने सन्मय गांधीचा 6-2, 6-2 असा सहज पराभव केला. यूएसएच्या आरव सानेने सुधांशू सावंतला 6-2, 6-4 असे पराभूत केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली पात्रता फेरी: मुले:
दक्ष प्रसाद(भारत)वि.वि.सुजन परब(भारत) 6-2, 6-3;
ईशान गोधभरले(भारत)वि.वि.सौरीश सिंग(भारत) 6-4, 4-6, 10-8;
श्रेय अरोरा(यूएसए)वि.वि.रोहन फुले(भारत) 4-6, 6-4, 10-6;
जैष्णव शिंदे(भारत)वि.वि.कनिष्क पांडे(भारत)6-3, 6-1;
सिद्धार्थ मराठे(भारत)वि.वि.निशित रहाणे(भारत) 6-4, 6-3;
आयुश भट(यूएसए)वि.वि.हर्ष सोनी(भारत) 6-0, 6-0;
मोहित बोनद्रे(भारत)वि.वि.इंद्रजीत बोराडे(भारत) 6-2, 6-0;
प्रसाद इंगळे(भारत)वि.वि.मनन चैतन्य(भारत) 6-3, 6-0;
गिरीश चौगुले(भारत)वि.वि.सन्मय गांधी(भारत) 6-2, 6-2;
रिषभ अगरवाल(भारत)वि.वि.अथर्व बिराजदार(भारत) 6-0, 6-1;
आरव साने(यूएसए)वि.वि.सुधांशू सावंत(भारत)6-2, 6-4;
मुली:
रिया भोसले(भारत)वि.वि.नुपूर फडके(यूएसए)6-0, 6-0;
अंजनी महेशकुमार(भारत)वि.वि.ख़ुशी शर्मा(भारत) 6-2, 6-2;
इशिता जाधव(भारत)वि.वि.अनिशा शेवते(भारत)6-2, 6-2;
साची पटवर्धन(भारत)वि.वि.जानकी जगननाथन(यूएसए)6-4, 6-2.