इंधनबचतीसाठी ‘सीएनजी’चा वापर वाढवायला हवा -शेखर इनामदार

Date:

विज्ञान परिषद-एमकेसीएल यांच्यातर्फे व्याख्यान
पुणे : “कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) वर चालणाऱ्या गाड्याचा वापर नागरिकांकडून केला जावा, हा एक चांगला पर्याय आहे. अशा प्रकारातील गाड्यांच्या वापरामुळे इंधनबचत तर होतेच, तसेच प्रदूषणालाही आळा बसतो. शहरात २००६ पासून या प्रकाराती चारचाकी गाड्यांचा वापर सुरु झाला. इलेट्रीक गाड्याच्या (ई व्हेईकल) माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणापेक्षाही सीएनजी गाड्या खूप कमी प्रदूषण करतात. त्यामुळे पुणेकरांनी सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा अधिकाधिक वापर करावा, असे मत अभियंते शेखर इनामदार यांनी व्यक्त केले.
 
मराठी विज्ञान परिषद पुणे विभाग आणि महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अभियंते शेखर इनामदार यांचे ‘इंधन बदलामुळे प्रदूषण नियंत्रण’ या विषयावर व्याख्यान झाले, यावेळी ते बोलत होते. मयूर कॉलनी परिसरातील भारतीय शिक्षण संस्था येथे झालेल्या या व्याख्यानाला मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सराफ, कार्यकारिणी सभासद वसंत शिंदे, दीपाली अकोलकर, विनय र र, कार्यवाह संजय मा. क आदी उपस्थित होते. 
शेखर इनामदार म्हणाले, “पुण्यात सीएनजी गॅस पंपची संख्या ५० असून, आणखी २० नवीन पंप सुरु होणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या विषयावर अभ्यास आणि संशोधन करीत असून, इराणच्या कंपनीने बनवलेले सीएनजी किट येथील गाड्यांमध्ये वापरुन प्रयोग केला आहे. परंतू ते भारतीय हवामानालामध्ये चालू शकले नाही. त्यानंतर भारतीय हवामानाला अनुकूल होईल असे काही बदल केले. यामध्ये प्रामुख्याने कार्बोरेटरमध्ये बदल केले. यानंतर ती गाडी पुण्यातील रस्त्यावर व्यवस्थित धावू शकेल, अशी बनविली. आतापर्यंत ६० गाड्यांना हे किट बसविले आहे. या किटची क्षमता जास्तीजास्त कशी वाढेल यावर अजून संशोधन सुरु आहे.
राजेंद्रकुमार सराफ म्हणाले, ”दुचाकी तसेच चारचाकी वाहन चालविणाऱ्यांना इंधन म्हणून सीएनजी गॅस वापर हा फायदेशीर ठरेल. यामुळे इंधन वापरावरील खर्च तसेच प्रदूषण कमी होईल. पर्यावरण प्रेमींनी तसेच विज्ञान अभ्यासकांनी या विषयाबद्दल लोकांमध्ये जागृकता वाढवावी.” दीपाली अकोलकर यांनी सूत्रसंचलन केले. विनय र र यांनी प्रस्तावना केली.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

रस्ता वाहतुकीसाठी तुमच्या आंदोलनासाठी नाही, या महिलेने पेटविली क्रांतीची ठिणगी

क्रांती करणारे..वेडेच ठरविले जातात : तिला शाळेतून मुअलाला पिकअप...

कोरेगाव पार्क–कल्याणी नगर–मुंढवा परिसरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांना गती-मुंढवा चौकात १२६ कोटींचा फ्लायओव्हर

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची माहिती पुणे,: कोरेगाव पार्क–कल्याणी...

खरात ची वरात कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मधून रुग्णालयाकडे

अशोक खरातची प्रकृती बिघडली:छातीत वेदना, डोकेदुखी, मळमळ, उलट्यांचा त्रास;...