एचकेसी 14 वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत एजीपी ग्रुप संघाचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश

Date:

पुणे: पीएमपी ग्रुप पुणे यांच्या वतीने आयोजित एचकेसी 14 वर्षाखालील करंडक क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत एजीपी ग्रुप संघाने  पुना वॉरीयर्स संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.  

पुना क्लब क्रिकेट मैदनानावर झालेल्या सामन्यात साखळी फेरीत यश महानवरच्या अचूक गोलंदाजीच्या बळावर एजीपी ग्रुप संघाने  पुना वॉरीयर्स संघाचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. पहिल्यांदा खेळताना  यश महानवर व यश बोरकर यांच्या अचूक गोलंदाजीपुढे  पुना वॉरीयर्स संघ केवळ 27.4 षटकात सर्वबाद 83 धावांत गारद झाला.  यश महानवरने केवळ 24 धावा देत 5 गडी बाद केले. 83 धावांचे लक्ष  धैर्य मानेच्या 34 व अक्रम सय्यदच्या नाबाद 13 धावांसह  एजीपी ग्रुप संघाने केवळ 14.5 षटकात 2 बाद 86 धावा करून सहज पुर्ण करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. 

दुस-या लढतीत  अभिग्यान कुंडूच्या दमदार अष्टपैलु खेळाच्या जोरावर   अविनाश साळवी फाउंडेशन संघाने क्लब ऑफ महाराष्ट्र संघाचा 8 गडी राखून पराभव केला. 

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:  

पुना वॉरीयर्स- 27.4 षटकात सर्वबाद 83 धावा(अथर्व एकबोटे नाबाद 17, आशिष गुजारे 17, अभिषेक कुलकर्णी 18, यश महानवर 5-24, यश बोरकर 2-24) पराभूत वि एजीपी ग्रुप- 14.5 षटकात 2 बाद 86 धावा(धैर्य माने 34, अक्रम सय्यद नाबाद 13, प्रणव देव 1-8) सामनावीर- यश महानवर 

एजीपी ग्रुप संघाने 8 गडी राखून सामना जिंकला. 

क्लब ऑफ महाराष्ट्र- 49.3 षटकात सर्वबाद 158 धावा(राज मसल 44, कुणाल अंबेदरे 23, रिध्देश भुरूक 20, अभिग्यान कुंडू 4-27, अदित्य खडका 3-23) पराभूत वि अविनाश साळवी फाउंडेशन- 43.2 षटकात 2 बाद 160 धावा(अभिग्यान कुंडू नाबाद102(142), तेजस गव्हाणे 1-30) सामनावीर-  अभिग्यान कुंडू

अविनाश साळवी फाउंडेशन संघाने 8 गडी राखून सामना जिंकला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

हि मस्ती दादागिरी कशाची ? देश तुमच्या बापाचा आहे काय ? विजय वडेट्टीवार संतापले

पुणे- राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम शनिवारी...

राहुल गांधींच्या कार्यक्रमाआधी पुण्यात काँग्रेस-ABVP कार्यकर्ते आमनेसामने; COEP परिसरात तणाव

‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाला उपस्थित राहू नका, अशी विद्यार्थ्यांना...

पोलीस उपनिरीक्षकावरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करा; चौकशीपर्यंत निलंबित करा

डॉ. नीलम गोऱ्हे यांची पुणे पोलीस आयुक्तांकडे मागणी पुणे.धिकाऱ्याला निलंबित...

गणेशोत्सव, नवरात्रोत्सवात महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशिक्षित स्वयंसेवकांची फळी उभारणार – डॉ. नीलम गोऱ्हे

स्त्री आधार केंद्राच्यावतीने महिला कार्यकर्त्यांना प्रशिक्षण पुणे.दि.२१: आगामी गणेशोत्सव आणि...