पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना व डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आणि बिलियर्ड्स अँड स्नूकर असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(बीएसएएम) यांच्या संलग्नतेने दुसऱ्या बिलियर्ड्स व 15रेड स्नूकर राज्य निवड अजिंक्यपद 2019 स्पर्धेत बिलियर्ड्समध्ये मुंबईच्या अरुण अग्रवाल याने आपली विजयी मालिका कायम ठेवत रयान राझमीचा पराभव करून आपल्या कारकिर्दीतील 14वे राजस्तरीय विजेतेपद पटकावण्याचा विक्रम नोंदविला.
डेक्कन जिमखाना येथील बिलियर्ड्स हॉलमध्ये पार पडलेल्या या अतितटीच्या अंतिम फेरीच्या लढतीत बिलियर्ड्समध्ये 61वर्षीय मुंबईच्या अरुण अग्रवालने आपला अनुभव व कौशल्याचा सुरेख मेळ साधत 21वर्षाखालील कुमार बिलियर्ड्स विजेता रयान राझमीचा 4-2(150(69)-116(60), 126-150, 150(50)-60, 150-107, 111-150(55), 150-121) असा पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. 4तास 30मिनिटे चाललेल्या या चुरशीच्या लढतीत अरुणने पहिल्या फ्रेममध्ये 69 गुणांचा ब्रेक नोंदवून ही फ्रेम 150(69)-116(60)अशी जिंकून आपले खाते उघडले. त्यानंतर युवा खेळाडू रयानने जोरदार खेळ करत दुसरी फ्रेम अरुण याच्याविरुद्ध 150-126अशी जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या फ्रेममध्ये अरुणने वरचढ खेळाचे प्रदर्शन करत रयानविरुद्ध 150(50)-60 अशी जिंकून सामन्यात आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये 113-107अशी स्थिती असताना रयानने पॉट मिस केला व याचाच फायदा घेत अरुणने 37 गुणांचा ब्रेक नोंदवून ही फ्रेम 150-107अशी जिंकून आपली आघाडी 3-1ने वाढवली. पिछाडीवर असलेल्या रयानने पाचव्या फ्रेममध्ये जोरदार कमबॅक करत 55गुणांचा ब्रेक नोंदवून ही फ्रेम 150(55)-111अशी जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. सहाव्या फ्रेममध्ये अरुणने चतुराईने खेळ करत ही फ्रेम रयानविरुद्ध 150-121अशी जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले.
विजेतेपदानंतर आनंद व्यक्त करताना अरुण अग्रवाल म्हणाले कि, अंतिम सामना हा अतिशय चुरशीचा झाला. रयान हा उत्तम युवा खेळाडू असून त्याने कडवी झुंज दिली. सामन्यात महत्वाच्या क्षणी रयानने चुका केल्या. क्यू स्पोर्ट्समध्ये असे गुणवान कुमार खेळाडू येत असल्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. माझ्या कारकिर्दीतील हे माझे 14वे राज्यस्तरीय बिलियर्ड्स मधील विजेतेपद असल्यामुळे माझ्यासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे.
तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या राजीव शर्माने चंदू कन्सोडरियाचा 3-1(150-111, 150-115, 108-150, 150-40) असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
स्नूकरमध्ये अंतिम पात्रता फेरीत मुंबईच्या स्पर्श फेरवानीने पुण्याच्या संतोष धर्माधिकारीचा 3-0(61-29, 62-33, 82(82)-01) असा सहज पराभव करून राउंड रॉबिन फेरी गाठली. स्पर्श याने आपल्या खेळीत तिसऱ्या फ्रेममध्ये 82गुणांचा ब्रेक नोंदविला. पुण्याच्या योगेश शर्मा योगेश शर्माने मुंबईच्या ऋषभ गोहिलचा 3-0(72-65, 47-36, 55-52) असा तर मुंबईच्या पोरस शहा याने पुण्याच्या माधव जोशीचा 3-1(40-23, 66-16, 01-72, 71-33) असा पराभव करून आगेकूच केली. पुण्याच्या राजवर्धन जोशीने मुंबईच्या संदीप वेंगुर्लेकरचा 3-0(71-22, 57-30, 75-17)असा पराभव करून राउंड रॉबिन फेइरत गाठली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अंतिम फेरी:
अरुण अग्रवाल(मुंबई)वि.वि.रयान राझमी(मुंबई)
4-2(150(69)-116(60), 126-150, 150(50)-60, 150-107, 111-150(55), 150-121).
तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी:
राजीव शर्मा(मुंबई)वि.वि.चंदू कन्सोडरिया(मुंबई) 3-1(150-111, 150-115, 108-150, 150-40);
स्नूकर: अंतिम पात्रता फेरी:
योगेश शर्मा(पुणे)वि.वि.ऋषभ गोहिल(मुंबई) 3-0(72-65, 47-36, 55-52);
पोरस शहा(मुंबई)वि.वि.माधव जोशी(पुणे) 3-1(40-23, 66-16, 01-72, 71-33);
स्पर्श फेरवानी(मुंबई)वि.वि.संतोष धर्माधिकारी(पुणे) 3-0(61-29, 62-33, 82(82)-01);
शयान राझमी(मुंबई)वि.वि.अमर रायकर(पुणे) 3-2(36-62, 71-16, 12-65, 81-26, 48-30);
सुमित आहुजा(मुंबई)वि.वि.समीर मागो(मुंबई) 3-2(71-64, 67(66)-01, 31-66, 52-59, 56-53);
पिनाक अनप(पुणे)वि.वि.राहुल नारंग 3-2(39-76, 66-42, 68-64, 16-61, 58-19);
ओमर फारुकी(औरंगाबाद)वि.वि.तहा खान
आनंद रघुवंशी(मुंबई)वि.वि.प्रशांत नातू(पुणे) 3-0(76-02, 65-28, 67-07);
राजवर्धन जोशी(पुणे)वि.वि.संदीप वेंगुर्लेकर(मुंबई) 3-0(71-22, 57-30, 75-17)