रुमा गायकवारी, अर्णव पापरकर यांना विजेतेपद
पुणे- महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) आणि पीएमडीटीए यांच्या संलग्नतेने आयोजित एमएसएलटीए-योनेक्स सनराईज पीएमडीटीए अखिल भारतीय मानांकन 12 वर्षाखालील चॅलेंज सिरीज स्पर्धेत मुलींच्या गटात रुमा गायकवारीने सोहा पाटीलचा, तर, मुलांच्या गटात अर्णव पापरकरने ऋषिकेश अय्यर याचा पराभव करत विजेतेपद पटकावले.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात अंतीम फेरीत पाचव्या मानांकीत रुमा गायकवारीने बिगर मानांकीत अपर्णा पटाईतचा 6-3, 6-1 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. उपांत्य फेरीत रूमाने अव्वल मानंकीत सोहा पाटीलचा 9-8(0) असा पराभव केला. रूमा डीईएस सेकंडरी स्कूल येथे सहावी इयत्तेत शिकते. रूमाचे हे या वर्षीतील सातवे विजेतेपद आहे. रूमा हिराबाग येथे प्रणव वेलणकर याच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलांच्या गटात दुस-या मानंकीत अर्णव पापरकरने अव्वल मानांकीत ऋषिकेश अय्यरचा 6-1, 6-2 असा पराभव करत विजेतेपद संपादन केले. उपांत्य फेरीत अर्णवने सोळाव्या मानांकीत केवल किरपेकरचा 9-2 असा पराभव केला. अर्णव न्यु इंंडीया स्कुल कोथरूड येथे तिसरी इयत्तेत शिकत असून त्याचे या वर्षातील हे चौथे विजेतेपद आहे. अर्णव बाऊंस टेनिस अकादमी येथे केदार शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.
विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना करंडक व प्रशस्तीपत्रक असे पारितोषीक देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषीक वितरण स्पर्धेचे संचालक प्रविण झिटे व सुपरवायझर अभिनव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी:
रुमा गायकवारी(5)वि.वि. सोहा पाटील(1) 9-8(0)
अपर्णा पटाईत वि.वि. कश्मिरा सुम्बरे(12) 9-8(5)
अंतीम फेरी- रुमा गायकवारी(5)वि.वि. अपर्णा पटाईत 6-3, 6-1
मुले:उपांत्य फेरी:
ऋषिकेश अय्यर(1)वि.वि. सर्वेश झावर 9-7
अर्णव पापरकर(2)वि.वि. केवल किरपेकर(16) 9-2
अंतीम फेरी- अर्णव पापरकर(2)वि.वि.ऋषिकेश अय्यर(1) 6-1, 6-2