Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत अनिर्बन नंदी, सानिश आंबेकर, सनत बोकील, स्नेहल पाटील, मनुश्री पाटील, सृष्टी हेलंगडी यांचा मुख्य फेरीत प्रवेश

Date:

पुणे- सुदेश शेलार मेमोरियल फाऊंडेशन व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने व टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 6व्या सुदेश शेलार मेमोरियल करंडक-11स्पोर्ट्स राष्ट्रीय मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत पुरुष गटात  अनिर्बन नंदी,  सानिश आंबेकर, सनत बोकील, महिला गटात स्नेहल पाटील, मनुश्री पाटील, सृष्टी हेलंगडी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत मुख्य फेरीत प्रवेश केला.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरूष गटात पात्रता फेरीत आरएसपीबीच्या अनिर्बन नांदीने महाराष्ट्र बच्या रेगन अल्बुकुरकूचा 3-2(11-7, 4-11, 11-9, 8-11, 11-7) असा तर, महाराष्ट्र बच्या सानिश आंबेकर याने गोव्याच्या वेस्ली दो रोसारिओचा 3-2(11-8, 9-11, 9-11, 11-8, 11-8)असा पराभव करून मुख्य फेरी गाठली.  महाराष्ट्र अच्या ओंकार तोरगळकरने बंगालच्या मैनक दासला 3-1(7-11, 11-6, 11-6, 11-6)असे पराभूत केले. महाराष्ट्र बच्या सनत बोकील याने गुजरातच्या ईशान हिंगोरानीचा 3-0(12-10, 11-7, 11-9)असा पराभव केला. महिला गटात आरएसपीबीच्या रुपसा भट्टाचार्यला महाराष्ट्र बच्या ईशा जोशीने 1-3 (11-8, 9-11, 6-11, 7-11) असे पराभूत केले. दिया चितळे हिने गुजरातच्या पवना दावेवर 3-0 (11-3, 14-12, 11-5)असा एकतर्फी विजय मिळवला.
महाराष्ट्राच्या स्वस्तिका घोषने छत्तीसगढच्या सुरभी मोदीला 3-0(11-4, 11-5, 11-6)असे नमविले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पात्रता फेरी:
अनिर्बन नांदी(आरएसपीबी)वि.वि.रेगन अल्बुकुरकू(महाराष्ट्र ब) 3-2(11-7, 4-11, 11-9, 8-11, 11-7);
सानिश आंबेकर(महाराष्ट्र ब)वि.वि.वेस्ली दो रोसारिओ(गोवा) 3-2(11-8, 9-11, 9-11, 11-8, 11-8);
पार्थ विरमनी(दिल्ली)वि.वि.तन्मय राणे(महाराष्ट्र ब) 3-2(11-6, 5-11, 11-8, 8-11, 11-9);
ओंकार तोरगळकर(महाराष्ट्र अ)वि.वि.मैनक दास(पूर्व बंगाल) 3-1(7-11, 11-6, 11-6, 11-6);
ईशान हिंगोरानी(गुजरात)पराभूत वि.सनत बोकील(महाराष्ट्र ब) 0-3(10-12, 7-11, 9-11);
सोमैया चिन्मया(महाराष्ट्र ब)वि.वि.जयंता चंद्रा(ओएफएससीबी) 3-0 (11-5, 11-7, 11-2);
उत्कर्ष गुप्ता(दिल्ली)वि.वि.कौशिक दास 3-0 (11-0, 11-0, 11-0);
दिपित पाटील(महाराष्ट्र अ)वि.वि.कौशल भट(गुजरात) 3-0(11-9, 11-7, 11-2);
झुबेन तारापोरवाला(महाराष्ट्र अ)वि.वि.सौविक बॅनर्जी(पश्चिम बंगाल)3-0(11-9, 11-4, 11-8)

महिला गट:
रुपसा भट्टाचार्य(आरएसपीबी)पराभूत वि.ईशा जोशी(महाराष्ट्र ब) 1-3 (11-8, 9-11, 6-11, 7-11);
स्वस्तिका घोष(महाराष्ट्र ब)वि.वि.सुरभी मोदी(छत्तीसगढ) 3-0(11-4, 11-5, 11-6)
मनुश्री पाटील(महाराष्ट्र ब)वि.वि.सुहाना नार्जीनरी(उत्तरप्रदेश)3-0 (11-0, 11-0, 11-0)
सृष्टी हेलंगडी(महाराष्ट्र अ)वि.वि.सतापोर्णि डी(पूर्व बंगाल) 3-0 (11-7, 11-7, 11-7);
दिया चितळे(महाराष्ट्र ब)वि.वि.पवना दावे(गुजरात) 3-0 (11-3, 14-12, 11-5);
पल्लबी कुंडू(आरबीआय)वि.वि.शाश्वती घोष(मध्यप्रदेश)3-1(12-10, 11-6, 9-11, 11-7)

 

युथ मुले(21वर्षाखालील)गट: पात्रता फेरी: 
राजीव साहू(छत्तीसगढ)पराभूत वि.सिवरामकृष्णन सचिनविश्वनाथ(तामिळनाडू) 0-3 (3-11, 7-11, 7-11);
श्रेयांश गोयल(दिल्ली)वि.वि.अलिको हझाईका(आसाम) 3-0(11-7, 12-10, 11-7);
नितीन सांगवान(हरियाणा)पराभूत वि.जिग्नेश राहातवाल(महाराष्ट्र ब) 1-3 (3-11, 12-14, 11-6, 4-11);
लक्षय सेठिया(हरियाणा)पराभूत वि.दिपित पाटील(महाराष्ट्र अ) 0-3 (5-11, 1-11, 4-11);
गोविंद शहा(तेलंगणा)पराभूत वि.विरेन पटेल(महाराष्ट्र ब) 0-3 (10-12, 10-12, 10-12);
साहिल शर्मा(चंदिगढ)वि.वि.धैर्य परमार(गुजरात) 3-2 (9-11, 11-6, 11-4, 11-13, 13-11);
गौरव शर्मा( छत्तीसगढ)पराभूत वि.पंकज कुमार(बिहार) 1-3 (11-3, 8-11, 6-11, 9-11);
अली मोहम्मद(तेलंगणा)वि.वि.इर्शाद मोहम्मद(तामिळनाडू) 3-0 (11-0, 11-0, 11-0);
विकास शेरॉन(हरियाणा)पराभूत वि.आदर्श छेत्री(दिल्ली) 2-3 (5-11, 11-7, 6-11, 11-7, 4-11);

युथ मुली(21वर्षाखालील)गट:
स्नेहल पाटील(महाराष्ट्र ब)वि.वि.नंदिनी नागोरी(राजस्थान) 3-0 (11-0, 11-0, 11-0)
पृथा पर्रीकर(गोवा)पराभूत वि.आदिती सिन्हा(महाराष्ट्र अ) 0-3 (3-11, 6-11, 7-11)
मिहिका रोहिरा(महाराष्ट्र अ)वि.वि.एम ब्रेंडा(पॉंडिचेरी) 3-0 (11-3, 11-6, 11-1)
प्रितिका सेनगुप्ता(महाराष्ट्र ब)वि.वि.क्रिशगीं कश्यप(आसाम) 3-1(11-7, 8-11, 11-7, 11-5);
विधी शहा(महाराष्ट्र अ)वि.वि.जयश्री के(पॉंडिचेरी)3-0(11-4, 11-6, 11-4)
मौली मोडक(पश्चिम बंगाल)वि.वि.नमना जयस्वाल(गुजरात) 3-0(11-4, 13-11, 11-8)
मिस्बाह सुमर(महाराष्ट्र ब)पराभूत वि.जिया जैन(हरियाणा)1-3 (4-11, 12-10, 9-11, 7-11);
ईशा स्वर(महाराष्ट्र ब)वि.वि.ख़ुशी जैन(मध्यप्रदेश) 3-2 (14-12, 12-10, 9-11, 7-11, 11-7)
मनुश्री पाटील(महाराष्ट्र ब)वि.वि.वर्तिका भारत(उत्तरप्रदेश) 3-0 (11-4, 11-5, 11-2);
समृद्धी कुलकर्णी(महाराष्ट्र ब)वि.वि.ताविशी बन्सल(उत्तरप्रदेश)3-2(11-3, 11-13, 6-11, 11-8, 11-9)

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पशुसंवर्धन विभागात अधिकाऱ्यांच्या समुपदेशनाद्वारे बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय

राज्यभरात मनुष्यबळाचा समतोल साधण्याचा प्रयत्न पुणे, दि.१४: राज्याच्या सर्व भागांमध्ये...

कसबा पेठेत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव सोहळा मोठया उत्साहात साजरा

‘शिव पर्वती विवाह सोहळा’ ठरला जन्मोत्सव सोहळ्याचे प्रमुख आकर्षण पुणे...

बँकॉकहून पुण्यात तस्करी:10.3 कोटींचे हायड्रोपोनिक गांजा पकडला-तिघांना अटक

पुणे-डायरेक्टरेट ऑफ कस्टम डिपार्टमेंट (डीआरआय) च्या पुणे, मुंबई शाखेतील...