एडब्लूइएस करंडक स्पर्धेत एफसी पुणे सिटी संघाला पराभवाचा धक्का

Date:

डेंपो एससीकडून एफसी पुणे सिटी १-३ने पराभूत

पणजी : राजेश वाधवान समूह आणि बॉलिवूड स्टार अर्जुन कपूर यांच्या सहमालकीच्या एफसी पुणे सिटी संघाला एडब्लूइएस करंडक स्पर्धेत तिसऱ्या लढतीत डेंपो स्पोर्ट्स क्लबकडून १-३असा पराभवाचा सामना करावा लागला. 
गोवा येथील टिळक फुटबॉल मैदानावर झालेल्या या लढतीत सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी बचावात्मक धोरण स्वीकारले. दोन्ही संघानी आपला बचाव अभेद्य ठेवत गोल होऊ न देण्याची खबरदारी घेतली. त्यामुळे पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला. 
 उत्तरार्धात मात्र डेंपो एससी संघाच्या खेळाडूंनी आक्रमक पवित्रा स्वीकारला. ५६व्या मिनिटाला डेंपोच्या मारिओ मॅसिअर्स याने गोल करून संघाचे खाते उघडले. त्यानंतर सहाच मिनिटांनी डेंपोच्या जेस्सल कार्नेरोने गोल करून संघाला २-०अशी आघाडी मिळवून दिली. ६८व्या मिनिटाला लातेश मांद्रेकरने गोल करून संघाला ३-०अशी विजयी आघाडी मिळवून दिली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या एफसी पुणे सिटीच्या खेळाडूंनी जोरदार प्रयत्न केले. अखेर ७७व्या मिनिटाला जेकब व्ही याने मिळालेल्या संधीचे सोने करत गोल करून हि १-३ने कमी केली. सामना बरोबरीत सोडविण्यासाठी एफसी पुणे सिटीच्या आघाडीच्या फळीने जोरदार चाली रचल्या, पण त्या डेंपोच्या मध्यरक्षकांनी यशस्वी होऊ दिल्या नाहीत.
निकाल: 
एफसी पुणे सिटी: १(जेकब व्ही. ७७ मि.)पराभूत वि.डेंपो स्पोर्ट्स क्लब: ३(मारिओ मॅसिअर्स ५६मि., जेस्सल कार्नेरो ६२मि., लातेश मांद्रेकर ६८मि.).          
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात पुण्यात आम आदमी पार्टीचा बैलगाडी मोर्चा

सरकारी पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी पुणे महानगरपालिकेला आम आदमी पार्टीचे...

पुण्यात पहिली ‘रोबोटिक-आसिस्टेड’ हृदय शस्त्रक्रिया यशस्वी.पारंपारिक ‘ओपन-हार्ट’ सर्जरीला आधुनिक पर्याय

पिंपरी,पुणे दि २५ मे, २०२६- पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात एक मोठी आणि अभिमानास्पद कामगिरी झाली आहे. पिंपरी येथील डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने पुण्यात पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे. पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीला (Open-Heart Surgery) हा एक सुरक्षित, जलद आणि आधुनिक पर्याय ठरला आहे. पिंपरी-चिंचवड येथील एका ४६ वर्षीय महिलेला 'रुमॅटिक हार्ट डिसीज' (Rheumatic Heart Disease - RHD) म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर हृदयाच्या झडपांना (व्हॉल्व्हला) होणारा आजार झाला होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचा मिट्रल व्हॉल्व्ह म्हणजे 'रक्तप्रवाह नियंत्रित करणारा पडदा खराब झाला होता. हा व्हॉल्व्ह बदलण्यासाठी शस्त्रक्रियेची गरज होती. पारंपारिक पद्धतीनुसार, अशा शस्त्रक्रियेसाठी छातीचे हाड (Breastbone) मधोमध कापून 'ओपन-हार्ट सर्जरी' करावी लागते. यामध्ये रुग्णाला खूप जास्त वेदना होतात, बरे होण्यास अनेक महिने लागतात आणि छातीवर मोठी जखम (डाग) राहते. पारंपारिक पद्धतीला फाटा देत डीपीयूच्या डॉक्टरांनी या शस्त्रक्रियेसाठी अत्याधुनिक रोबोटिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला. यामध्ये छातीचे मुख्य हाड न कापता, बरगड्यांच्या मधून लहान छिद्र पाडून ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. हाडांना कोणतीही इजा न झाल्यामुळे पारंपारिक ओपन-हार्ट सर्जरीच्या तुलनेत रुग्णाचा त्रास आणि वेदना खूपच कमी झाल्या. या आधुनिक उपचार पद्धतीमुळे रुग्णामध्ये अतिशय जलद सुधारणा झाली आणि ती अवघ्या काही दिवसांतच स्वावलंबी होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली. या शस्त्रक्रियेनंतर छातीवर कोणताही मोठा किंवा विद्रूप डाग राहिला नाही, एकंदरीत, कमीत कमी त्रासाच्या या सुरक्षित उपचारामुळे रुग्ण अवघ्या अवघ्या दोन आठवड्यांतच आपल्या नेहमीच्या कामावर परतणे सहज शक्य झाले. "डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या हृदय शस्त्रक्रिया विभागातील तज्ज्ञ शल्यचिकित्सक डॉ. आशिष बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात पहिली ऐतिहासिक रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. भूलतज्ज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, डॉ. वेणूराज वारके आणि यांच्या बहुविभागीय तज्ज्ञ टीमने यशस्वीरीत्या ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची प्रकृती अतिशय वेगाने सुधारली. शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्याच दिवशी रुग्ण स्वतःहून चालण्या-बोलण्यास आणि दैनंदिन हालचाली करण्यास सक्षम झाला. तिसऱ्या दिवशी रुग्णाने हॉस्पिटलच्या जिममधील पुनर्वसन (Rehabilitation) सुविधेतही सहभाग घेतला. महिन्यांऐवजी अवघ्या काही दिवसांतच रुग्ण पूर्णपणे निरोगी व्यक्तीसारखा धावपळ करू लागला. "पुण्यातील पहिली अत्याधुनिक रोबोटिक पद्धतीने करण्यात आलेली हृदयाच्या झडपेची शस्त्रक्रिया यशस्वी करणे हा आमच्यासाठी एक अभिमानाचा टप्पा आहे. डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने नेहमीच अत्याधुनिक नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उत्कृष्टतेचा मेळ घालून रुग्णांना सुरक्षित आणि जागतिक दर्जाचे उपचार देण्यासाठी कटिबद्ध आहे." – मा. डॉ. पी. डी. पाटील (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) "हा टप्पा आमच्या रुग्णांना जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आमच्या ध्येयाची साक्ष देतो. आम्ही हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण, ECMO अशा सर्व प्रगत कार्डिओ-थोरॅसिक शस्त्रक्रिया करत आहोत. आता रोबोटिक तंत्रज्ञानामुळे रुग्णांच्या सेवेचा दर्जा आणखी उंचावला आहे."...

एआयचा रंगभूमीवर विपरीत परिणाम होणार नाही:नसिरुद्दीन शाह, परेश रावल यांनी व्यक्त केला विश्वास

पुणे-ज्येष्ठ रंगकर्मी नसिरुद्दीन शाह आणि परेश रावल यांनी कृत्रिम...