पुणे- भारतातील सर्वोत्तम रॅम क्वालिफायर, द डेक्कन क्लिफहँगर आणि 1750 किमी लांबीचा अल्ट्रा स्पाइस रेस यांच्या तर्फे द ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही शरीयत 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबर 2018 दरम्यान लेह येथे पार पडणार आहे.
ग्रेट हिमालयन अल्ट्रा सायकल शर्यत ही जगातील सर्वाधीक उंच्च स्थरावरील अल्ट्रा सायकल शर्यत आहे. 3500 मीटर उंची असलेल्या जगातील सर्वाधीक उंच पासेस असलेल्या लेह, लडाख येथे ही स्पर्धा पार पडणार आहे. रॅम क्वालिफायर अल्ट्रा रेस मध्ये आजपर्यंत झालेल्या शर्यतींपेक्षा जास्त उंचीवर ही शर्यत होत आहे. ही स्पर्धा वैयक्तिक(सोलो) व सांघिक गटात होणार आहे.
स्पर्धेत स्पर्धकांना 600 कि.मीचा टप्पा पार करायचा आसून यामध्ये . स्पर्धकांना सपोर्ट वेहीकल आणि क्रु असणे आवश्यक आहे. हिमालयातील खडतर मार्ग पार करायचा आहे. शर्यतीची सुरूवात लेह येथून होऊन पुढे शर्यतीचा मार्ग जम्मू-काश्मीरमधील लडाख आणि कारगिलिग येथील नेत्रदीपक हिमालय पर्वतश्रेणीतून जाणारा एनएच1 या मार्गावरून असेल. हा मार्ग पुढे इन्ससच्या पठाराच्या खाली झान्स्कर येथे सामील होतो आणि एका नयनरम्य संगमावर सिंधू नदिचा रंग बदलतो जो स्पष्टपणे मार्गवरून दिसतो. पुढे कारगिल कडे जाणारा शर्यतीतील उताराचा टप्पा सूरू होतो. पुढे शर्यतीतील सर्वाधीक उंचीवरील मार्ग फॉटू येतो. ही अत्यंत अत्कंठा वर्धक शर्य आहे कारण शर्यतीत सर्वातीत कमी उंचीचा कारगिलचा 2600 मीटरचा टप्पा पार करून आता स्पर्धकांना शर्यतीततल सर्वात उंचीची फॉटू ला टॉप 4100 मीटर उंचीचा टप्पा पार करायचा असतो.
स्पर्धेत पाचव्या मालीकेतील द डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेतील दुसरा क्रमांक पटकावणारा मुंबईचा कबीर राचुरे, सैन्यातील एव्हरेस्ट समिटीयर विशाल अहलावत, सुमित पाटील,अमित समर्थ यांसाऱखे दिग्गज सायकलपटु आपले कैशल्य पणाला लावणार आहेत.
या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी चेसिंग हिमालयाजचे वसिम बारी, रोव्हर्स डेनच्या ग्रिष्मा सोले, लडाख ऑक्सिजन मॉन विकी नियाझ, लडाख ऑर्गेनीक फार्मर्स फाउंडेशनचे संस्थापक झुबीर अहमद, ट्रंप स्पोर्टस् वेअरचे संजन राणा यांचे सहकार्य लाभले आहे.