मुंबई :महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या तर्फे आयोजित 12व्या रमेश देसाई मेमोरियल 12वर्षाखालील सब-ज्युनियरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलींच्या गटात गुजरातच्या चांदणी श्रीनिवासन, दिल्लीच्या तेजस्वी दबस यांनी, तर मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या रोहन अगरवाल, महाराष्ट्राच्या मानस धामणे या खेळाडूंनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत 12 वर्षाखालील मुलींच्या गटात तिसऱ्या मानांकित गुजरातच्या चांदणी श्रीनिवासनने अव्वल मानांकित श्रुती अहलावाटचा 6-0, 6-1 असा सनसनाटी पराभव करून खळबळजनक निकालाची नोंद केली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत दिल्लीच्या सहाव्या मानांकित तेजस्वी दबसने पाचव्या मानांकित कर्नाटकाच्या सोहा सिंग 6-0, 6-3असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली.
मुलांच्या गटात पश्चिम बंगालच्या दहाव्या मानांकित रोहन अगरवाल याने तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या हर्ष फोगटचा 7-5, 3-6, 6-4असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. महाराष्ट्राच्या चौथ्या मानांकित मानस धामणेने सहाव्या मानांकित आपला राज्य सहकारी काहीर वारिकचा 7-5, 6-0असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. अंतिम फेरीत मानस धामणेचा सामना रोहन अगरवाल याच्याशी होणार आहे.
दुहेरीत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात हर्ष फोगटने ऋषील खोसलाच्या साथीत हर्ष राघव व देबसिस साहू यांचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. मानस धामणे व प्रणव रेथीन यांनी रोहन अगरवाल व वंश नांदल या जोडीचा 6-2, 6-2 असा पराभव करून आगेकूच केली. मुलींच्या गटात श्रुती अहलावाट व मलिष्का कुरामु या जोडीने समीक्षा दबस व तेजस्वी दबस यांचा 6-4, 6-1 असा तर, निराली पदनिया व सौम्या रोंडे यांनी सोहा सिंग व चांदणी श्रीनिवासन यांचा 6-
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपांत्य फेरी: एकेरी गट:12वर्षाखालील मुली: चांदणी श्रीनिवासन (गुजरात)(3)वि.वि.श्रुती अहलावाट(हरियाणा)(1)6-0, 6-1; तेजस्वी दबस(दिल्ली)(6)वि.वि.सोहा सिंग(कर्नाटक)(5)6-0, 6-3;
12वर्षाखालील मुले:रोहन अगरवाल(पश्चिम बंगाल)(10)वि.वि.हर्ष फोगट (दिल्ली)(3)7-5, 3-6, 6-4; मानस धामणे (महा)(4)वि.वि.काहीर वारिक(महा)(6) 7-5, 6-0;
दुहेरी गट: उपांत्य फेरी: मुले: हर्ष फोगट/ऋषील खोसला(1)वि.वि.हर्ष राघव/देबसिस साहू(3)6-3, 6-2;मानस धामणे/प्रणव रेथीन वि.वि.रोहन अगरवाल/वंश नांदल6-2, 6-2;
मुली: श्रुती अहलावाट/मलिष्का कुरामु