पुणे – यंदाचा क्रिकेट हंगाम हा नांदे येथील सिध्दार्थ गुहा व हडपसरमधील ऋषिकेश मोरे यांच्या स्मरणात कायमचा राहील. याचे कारण या दोघांनी क्रिकेट हंगामाच्या काळात राष्ट्रीय ‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा फेसबुकच्या माध्यमातून जिंकली आहे.
भारतीय नागरिकांना क्रिकेटचे भलतेच वेड असते. त्यामुळेच जेव्हा ‘व्होडाफोन’ने ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा आयोजित केली, तेव्हा क्रिकेट खेळाचे चाहते असलेल्या ‘व्होडाफोन’च्या ग्राहकांनी त्यास भरभरून प्रतिसाद दिला. तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने आयफोन जिंकण्याची संधीही पटकावली. ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धा ही ‘व्होडाफोन’च्या ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या मोहिमेचाच एक भाग आहे.
सिध्दार्थ गुहा हे 59 वर्षांचे निवृत्त बॅंक कर्मचारी आहेत. त्यांना ‘व्होडाफोन’तर्फे जेव्हा अभिनंदनाचा कॉल आला, की त्यांनी ‘आयफोन 7’ जिंकला आहे, तेव्हा त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. ‘’व्होडाफोन’च्या उत्कृष्ट सेवेमुळे मी या कंपनीचा कायमचा ग्राहक बनलो आहे. आयफोन जवळ बाळगण्याचे स्वप्न मी पाहिले होते. ‘व्होडाफोन’मुळे हे स्वप्न साकार झाले आहे. ‘व्होडाफोन’चे आभार मानण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत’’, अशी भावना गदगदलेल्या स्वरांत सिध्दार्थ गुहा यांनी व्यक्त केली.
‘व्होडाफोन द अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ या उपक्रमात नागरिकांना काही सोपे प्रश्न विचारून त्यांचे क्रिकेटविषयीचे ज्ञान पडताळून पाहिले जाते. ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’च्या माध्यमातून या क्रिकेटवेड्यांना, क्रिकेटच्या फॅन्सना, तशी संधी दिली जाते व त्यांचे कौतुक केले जाते. ‘व्होडाफोन’च्या ग्राहकांना या स्पर्धेत भाग घेऊन आयफोन जिंकायचा असेल, तर त्यांनी क्रिकेट सामना सुरू असताना टिव्हीवर जाहिराती लागल्यावर, त्या ‘ब्रेक’च्या काळात विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे द्यायची आहेत. या करीता त्यांनी ‘202#’ या क्रमांकावर कॉल करायचा अथवा ‘व्होडाफोन झुझू फेसबुक’च्या ‘पेज’वर लॉगिन करून तेथे आपली उत्तरे नोंदवायची आहेत. जाहिरातीच्या प्रत्येक ‘ब्रेक’मध्ये एक आयफोन जिंकण्याची संधी यातून मिळते. तसेच विजेत्यांना आता तर आणखी एक अनोखी भेट दिली जाणार आहे .. इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर जाऊन भारत व इंग्लंड यांच्यातील सामना प्रत्यक्ष पाहण्याची. विजेत्या स्पर्धकाला त्याच्या जोडीदारासह या’ राऊंड ट्रीप’ची तिकिटे मिळणार आहेत.
‘व्होडाफोन इंडिया’चे महाराष्ट्र-गोवा विभागाचे बिझनेस प्रमुख आशिश चंद्रा यांनी ‘फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना आमंत्रित केले आहे. ते म्हणाले, की ‘व्होडाफोन इंडिया’मध्ये आम्ही नावीन्यपूर्ण योजना आखतो व ग्राहकांना गमतीचे व विविध अनुभव देत असतो. क्रीडा क्षेत्राशी ‘व्होडाफोन’चा नेहमीच जवळचा संबंध आलेला आहे. कोणत्याही क्रीडा सामन्यात त्या खेळाचा चाहता हाच खरा जीव लावत असतो व आनंद मिळवीत असतो. या चाहत्यांच्या या क्रीडा-प्रेमाचे कौतुक करण्यासाठी ‘व्होडाफोन’ने विविध क्रीडा स्पर्धांना आपला ब्रॅन्ड पुरवला आहे व उत्तेजनही दिले आहे. ‘व्होडाफोन’च्या या प्रयत्नांची वाखाणणी क्रीडा चाहत्यांनी व कंपनीच्या ग्राहकांनी कायम केली आहे. ‘अनऑफिशिअल स्पॉन्सर ऑफ फॅन्स’ ही मोहीम ही याच धोरणाचा भाग आहे. ‘व्होडाफोन फॅनटॅस्टिक ब्रेक्स’ स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खेळाच्या चाहत्यांना बक्षिसे तर देतोच, त्याशिवाय एक रोमांचकारी, अविस्मरणीय अनुभवही देतो. यातून आम्ही या चाहत्यांशी जवळकीचे नाते प्रस्थापित करीत असतो.