Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

एफसी पुणे सिटीकडून अर्जेंटिनाचा रॉबेर्टिनो पुगलिआरा करारबध्द

Date:

पुणे- राजेश वाधवान समुह यांच्या मालकीच्या इंडियन सुपर लीग(आयएसएल)मधील क्लब असलेल्या एफसी पुणे सिटी संघाने अर्जेंटिनाच्या रॉबेर्टिनो पुगलिआरा याला करारबध्द केले आहे. इंडियन सुपर लीग स्पर्धेत रॉबेर्टिनो हा पहिल्यांदाच पर्दापण करत असून एफसी पुणे सिटीने एमिलिआनो अल्फारो, मार्सिलिन्हो, डिएगो कार्लोस व जोनातन लुक्का या  खेळाडूंसह करारबध्द केलेला हा दक्षिण अमेरिकेतील पाचवा खेळाडू आहे.

रॉबेर्टिनो पुगलिआरा याचा एफसी पुणे सिटी संघात समावेश केल्याची अधिकृत घोषणा एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी आज केली. रॉबेर्टिनो हा अनुभवी, सर्जनशील व अष्टपैलु मध्यरक्षक आहे. त्याचा समावेश संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे आणि त्याची उत्कृष्ट कार्यशैली हे प्रतिस्पर्ध्यांसाठी कडवे आव्हान असणार आहे. एफसी पुणे सिटी संघात मी त्याचे स्वागत करतो, असे मोडवेल यांनी नमुद केले.

रॉबेर्टिनो याने आपल्या कारकिर्दीची सुरूवात सॅन लोरेंझो संघाकडून केली. त्यानंतर तो टॉलेरेस दी कोर्दोबा संघाकडून २ वर्षे खेळत होता. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वाधिक काळ पर्सिजा जकार्ता, पेर्सिबा बालीकपापण, पीएसएम मसकास्सर, पेर्सिब बदुंग व पेर्सिपुरा जयपुरा या इंडोनेशियन क्लबकडून खेळण्यात घालवला. त्याच्या लक्षवेधी कामगिरीमुळे  पेर्सिजा जकार्ता संघाने २०११ व २०१२ मध्ये सलग दोन वर्षे ट्रोफओपेर्सिजाचे विजेतेपद पटकावले.

एसीएफसी कपमध्ये रॉबर्टिनोने बेंगळुरू संघाविरुद्ध पर्थिपुरा जेयपुराचे प्रतिनिधित्व केले. 2015 च्या एएफसी कप स्पर्धेत बेंगळूर संघाविरुद्ध त्याने उत्कृष्ट खेळी करत बेंगळूर संघाची चांगलीच कोंडी केली होती.

संघातील सहभागाबाबत बोलताना रॉबर्टिनो म्हणाला की, माझ्या कारकीर्दीची ही नवीन सुरूवात आहे. माझ्या कारकीर्दीतील बहुतेक वेळा इंडोनेशियात खेळताना नवीन संस्कृती, नवीन शैली मी स्विकारल्या आहेत. एएफसी सामन्यां दरम्यान मी भारतातील अव्वल खेळाडूंना पाहीले आहे. त्यांची गुणवत्ता पाहून मी अतिशय प्रभावित झालो आहे. अशा प्रतिभावान भारतीय खेळाडूंशी स्पर्धा करण्यासाठी मी उत्सुक आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...