Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पुणे नवरात्रौ महोत्सवाअंतर्गत श्री लक्ष्मीमाता कला -संस्कृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर

Date:

अभिनेता सुबोध भावे, महिला क्रिकेटपटू मोना मेश्राम , विवेक वेलणकर ,
 ह. भ. प. महंत पुरुषोत्तम पाटील ,बरखा जळगावकर यांची निवड 
पुणे-
पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत अभिनेता सुबोध भावे , भारतीय क्रिकेटपटू मोना मेश्राम , माहिती अधिकार कार्यकर्ते व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी विवेक वेलणकर, ह. भ. प. महंत पुरुषोत्तम पाटील, लावणी सम्राज्ञी बरखा जळगावकर  यांना  यंदाचा श्री लक्ष्मीमाता कला -संस्कृती जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती   माजी उपमहापौर व पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल म्हणाले की, कला , संस्कृती ,नृत्य , गायन ,वादन यांचा मनोहारी संगम असलेला पुणे नवरात्रौ महोत्सव यंदा २३ वे वर्ष साजरे करीत आहे . या महोत्सवाअंतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा  श्री लक्ष्मीमाता कला -संस्कृती जीवनगौरव पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येतो. यंदा अभिनेता सुबोध भावे यांना उत्कृष्ट अभिनयाबद्दल तर भारतीय महिला क्रिकेट संघात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या  मोना मेश्राम यांना उत्कृष्ट क्रिकेटपटू  तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात भरीव योगदान देताना माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून समाजाचे प्रश्न सोडविणारे सजग नागरिक मंच, पीएमपी प्रवासी मंचचे विवेक वेलणकर यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल तर विविध विषयांवर भजन -कीर्तनाद्वारे समाजामध्ये प्रबोधन करणारे ह.भ.प. महंत पुरुषोत्तम पाटील यांना आध्यात्मिक पुरस्कार आणि लावणी सम्राज्ञी बरखा जळगावकर यांना कलाविष्कार पुरस्कार प्रदान करून या सर्वांचा  सन्मान करण्यात येणार आहे .श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे  २१ सप्टेंबर ते ३० सप्टेंबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी हा पुणे नवरात्रौ महोत्सव साजरा होणार असल्याचेही आबा बागुल यांनी सांगितले. 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढवावा-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

श्री सरस्वती कराड हॉस्पिटलचे उद्घाटन‘केअर’, ‘क्युअर’ व ‘हील’ तत्वांशी...

दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप च्या पुनरागमनाची चाहूल

पुणे- दुप्पट मताधिक्याने पोटनिवडणुकांमधील विजय ही तर देशभरातील आप...

रसिकांची दाद कलाकारांना सुखावते : पं. सुहास व्यास

पंचामृत संगीत कला प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ कलाकारांचा गौरव डॉ. श्याम गुंडावार,...

डॉ. दीपक हरके यांना अमेरिका, बोस्टन येथील ग्लोबल युनिव्हर्सिटीची ॲानररी डॅाक्टरेट

गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या हस्ते सन्मानित पिंपरी, पुणे...