पुणे-– प्रविण मसालेवाले प्रायोजि
बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपुर्व फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत प्रथमेश पाटीलने सहाव्या मानांकीत अनिरूध्द नल्लापाराजूचा 6-3, 6-3 असा पराभव केला तर अझमिर शेखने सातव्या मानांकीत राधेय शहाणेचा 7-5, 1-6, 6-2 असा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
अव्वल मानांकीत मानस धामणेने शौर्य राडेचा 6-0, 6-1 असा पराभव केला. दुस-या मानांकीत जैश्णव शिंदेने हर्ष ठक्करचा 6-2, 6-3 असा तर पाचव्या मानांकीत अर्णव पापरकरने केवल किरपेकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
मुलींच्या गटात उपउपांत्यपुर्व फेरीत बिगर मानांकीत जुई काळेने चौथ्या मानांकीत हृिती अहूजाचा 6-7(0), 6-3, 6-2 असा टायब्रेकमध्ये तर बिगर मानांकीत रिया मथारूने तिस-या मानांकीत स्वरा काटकरचा 6-3, 7-5 असा पराभव करत खळबळजनक निकालाची नोंद केली. अव्वल मानांकीत ईरा शहाने प्राप्ती पाटीलचा 6-1, 3-6, 6-0 असा तिन सेटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: उपउपांत्यपुर्व फेरी फेरी: मुले:
मानस धामणे(1) वि.वि शौर्य राडे 6-0, 6-1
जैश्णव शिंदे(2) वि.वि हर्ष ठक्कर 6-2, 6-3
राघव हर्ष(3) वि.वि पृथ्विराज बारी 6-2, 6-1
अंशूल सातव(4) वि.वि नील जोगळेकर 6-0, 6-2