स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत होणार शिवबांचा विवाह-सोहळा

Date:

जिजाऊ लावणार शिवबा आणि साईबाई यांचं लग्न – ‘स्वराज्यजननी जिजामाता  विवाह–सप्ताह विशेष‘ ५–१० ऑक्टोबर

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत जिजाऊंनी शिवबांना हाताशी घेऊन पुण्याची पुनर्बांधणी सुरू केली आहे. शहाजी राजांनी पाठवलेली कवड्यांची माळ मिळवण्यास आपण पात्र आहोत, हे शिवबांनी सिद्ध केलं आणि भोसल्यांचं लेणं असलेली कवड्यांची माळ अभिमानानं परिधान केली.

दरम्यान शिवबांच्या आयुष्यातल्या महतत्त्वपूर्ण घटना स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. लवकरच शिवबा आणि सईबाई यांचा विवाह-सोहळा पार पडणार आहे. शिवबा आणि सईबाई यांच्या लग्नाची रंजक कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

जिजाऊंनी फलटणचे निंबाळकर यांच्या सईबाईंशी शिवबांचा विवाह ठरवला याला बरीच राजकीय कारणं होती. स्वराज्य स्थापनेच्या मोहिमेतलं ते एक महत्त्वाचं पाऊल होतं. शिवबा आणि सईबाईंच्या लग्नाला शहाजीराजे बंगळूरहून पोचू शकले नाहीत, तेव्हा जिजाऊंनी एकट्यांनी शिवबांच्या लग्नाची जबाबदारी लीलया पेलली. ही सोयरीक जुळावी ह्यासाठी जिजाऊ जितक्या प्रयत्नशील होत्या, तितकाच किंबहुना त्याहून अधिक प्रयत्न ही सोयरीक जुळू नये, ह्यासाठी शत्रू पक्ष करत होता. पण आजपासून साधारण पावणे चारशे वर्षांपूर्वी अमीनसारखा बलाढ्य शत्रू समोर असताना एकट्या स्त्रीनं शिवबांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं होतं आणि हा रोमहर्षक आणि चित्तथरारक इतिहास आता या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत ५ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर प्रेक्षकांना ‘विवाह-सप्ताह’ पाहायला मिळणार आहे. मुलखावेगळ्या आईची ही गाथा आता रंजक अशा वळणावर येऊन पोचली आहे. जिजाऊ रयतेचा जाणता राजा घडवत आहेत. ‘स्वराज्यजननी जिजामाता’  सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा.  सोनी मराठी वाहिनीवर.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विणकर सभागृहासमोरील जनसंपर्क कार्यालयावर पडणार महापालिकेचा हातोडा?

ॲमेनिटी स्पेसवरील अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश; शहर अभियंता अनिरुद्ध...

धंगेकर, मग एकनाथ शिंदेंवरही कारवाईची मागणी करणार का? भाजप नेते पुष्कर तुळजापूरकरांचा सवाल!

अशोक खरात प्रकरणात चंद्रकांत पाटील यांच्यावरील कारवाईच्या मागणीला भाजपचे...