पुणे -आज पुणे पोलीस आयुक्त कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर, एका वृद्ध नागरिकावर गोळीबार झाल्याची धक्कदायक घटना भरदिवसा घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटेनेतील वृद्ध व्यक्तीचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. राजेश कनाबर(वय-६३) असे या घटनेतील मृत वृद्ध व्यक्तीचे नाव आहे.
दरम्यान घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, पुणे पोलीस आयुक्त कार्यालयपासून काही अंतरावर एसबीआय बँकेची ट्रेझरी आहे. त्या बँकेच्या बाहेरील फुटपाथवर आज दुपारी तीन वाजेच्या सुमारास हल्लेखोरांनी एका वृद्ध नागरिकावर गोळीबार केला. यामध्ये संबधित वृद्ध व्यक्ती खाली कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
जखमी व्यक्तीला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्याना त्यांचा मृत्यू झाला. या परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून हल्लेखोरांचा तपास सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसाकडून सांगण्यात आले आहे. मृत व्यक्तीचा बाणेर येथील जागेवरून एक वादा होता. त्यासाठी ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. सुनावणी झाल्यावर, ते फुटपाथवरून जात असताना, मागून पळत आलेल्या दोन हल्लेखोरांनी काही समजण्याच्या आतमध्ये त्यांच्यावर गोळी झाडली. यामुळे ते खाली कोसळले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
खराडी येथे एका सराईत गुन्हेगाराचा सोमवारी सकाळी दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. खराडीतील खुनाची घटना ताजी असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ असणाऱ्या स्टेट बॅंकेजवळील पदपथावर एका 60 वर्षांच्या बांधकाम व्यावसायिकावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.
पोलिस आयुक्तालय व बंडगार्डन पोलिस ठाणे हे गोळीबाराची घटना घडलेल्या ठिकाणापासून हाकेच्या अंतरावर आहे. असे असतानाही थेट या परिसरात येऊन गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल गेल्याची सद्यस्थिती आहे.