महापौर मुक्ता टिळकांनी घेतला मुलींचा पहिला तास
पुणे- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी १९८० मध्ये स्थापन केलेल्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आज ८१ वर्षांनंतर पुन्हा सह-शिक्षणास प्रारंभ झाला आणि नवीन प्रवेश घेतलेल्या मुलींचा शाळेच्या पहिल्या दिवशी पहिला तास पुण्याच्या महापौर आणि टिळक घराण्याच्या सूनबाई मुक्ता टिळक यांनी घेतला.
न्यू इंग्लिश स्कूलमध्ये १९३६ पर्यंत विद्यार्थिनींना प्रवेश दिल्याच्या नोंदी आढळतात. त्यानंतर ८१ वर्षे या शाळेत ङ्गक्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात होता. या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थिनींना प्रवेश देऊन सह-शिक्षण सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या व्यवस्थापनाने घेतला. या ऐतिहासिक घटनेच्या तुम्ही सार्या जणी घटक आहात, झाशीची राणी लक्ष्मीबाईप्रमाणे पराक‘मी व्हा, अशा शब्दात महापौरांनी विद्यार्थिनींचे स्वागत केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह डॉ. श्रीकृष्ण कानेटकर, संचालक सुनील भंडगे, मु‘याध्यापक नागेश मोने यांची प्रमुख उपस्थित होती.
लोकमान्य टिळक, समाजसुधारक आगरकर, विष्णूशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी या धुरीणांनी १८८० मध्ये नाना वाड्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात वर्गात बेंच नव्हते. मुलांना जमिनीवर बसावे लागायचे. ही जमीन खडबडीत व खड्डेयुक्त होती. शाळा सुरू व्हायच्या आधल्या दिवशी लोकमान्यांनी वर्गाची स्थिती पाहिली. मुलांची गैरसोय व्हायला नको म्हणून स्वतः खड्डे बुजवून जमीन शेणाने सारवून घेतली. ही आठवण सांगून या धुरीणांची दूरदृष्टी आणि त्यांनी घेतलेल्या अपार कष्टांमुळेच आज हे शैक्षणिक वैभव पाहायला मिळत आहे, असे मत महापौर टिळक यांनी व्यक्त केले.
राम गणेश गडकरी, केशवसूत, बाळासाहेब खेर, ना. ग. गोरे, एस. एम. जोशी, गोपिनाथ तळवलकर असे प्रतिभावंत विद्यार्थी घडविणार्या या शाळेत पालकांची मागणी लक्षात घेऊन यावर्षीपासून विद्यार्थिनींना प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर्षी इयत्ता पाचवीत ३० विद्यार्थिनींनी प्रवेश घेतला असून ही सं‘या शंभरपर्यंत वाढू शकते असा विश्वास अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांनी व्यक्त केला.
तारांगण, वेधशाळा, भूगर्भशास्त्र संग‘हालय, सर्जन मंचाद्वारे चित्रकला, शिल्पकला व ओरिगामी प्रशिक्षण, इंग‘जी प्रयोगशाळा, सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहंम भारत, समाजसेवा शिबिरे, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन असे वैशिष्ट्यपूर्ण उपक‘म शाळेत राबविले जातात अशी माहिती मु‘याध्यापक नागेश मोने यांनी दिली.