पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बीएमसीसी डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
सतत हसत राहावे, चांगल्या कामाचे कौतुक करावे, कोणाचाही अवमान करु नये, अहंकार टाळावा आणि जे काही कराल ते उत्तम करावे असा संदेश श्री. नाईक यांनी यावेळी बोलताना दिला.
डिजिटल क्लासरूमच्या बोर्डवर प्राध्यापकांना बोटाने लिहिता येणार आहे. लिहिलेल्या गोष्टी आपोआप ङ्गाईलममध्ये सेव्ह होणार आहेत. विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. या ङ्गाईल शेअरही करता येतील. विविध विषयांवरील यू ट्यूबवरील व्या‘याने विद्यार्थ्यांना वर्गात पाहाता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक व्हिडिओ, स्पिकर, इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३ क्लासरूम डिजिटल करण्यात आल्या असून या वर्षअखेर ४२ वर्गखोल्या डिजिटल केल्या जातील अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी दिली.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक यांची प्रमुख उपस्थिती होती.
डिजिटल क्लासरूमचे बीएमसीसीत उद्घाटन
Date: