पुणे – विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी व हसतखेळत गणित शिकता यावे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड भारतीय गणिती श्रीनिवासन रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणती जत्रा आयोजित करण्यात आली होती.
वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जादूचे चौकोन, त्रिकोणमिती, मोजमाचे, उंची मोजणे, पायथॅगोरसचे प्रमेय आदी गणिताच्या संकल्पना मजेशीर खेळांच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या. एकूण ८४ खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३४ व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० खेळ मांडण्यात आले होते. बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पन्नास स्टॉलवर १२० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे व मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप रावडे, देविदास झोडगे, ठकसेन कनोजे, स्वाती जज्जल या गणिताच्या शिक्षकांनी संयोजन केले.
न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे गणित जत्रा
Date: