पुणे – प्रविण मसालेवाले प्रायो
बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अश्विन नरसिंघानीने आठव्या मानांकीत जय पवारचा 2-6, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. अव्वल मानांकीत मानस धामनेने वेद ठाकूरचा 6-2, 6-1 असा पराभव केला. चौथ्या मानांकीत अंशूल सातवने अर्णव कोकणेचा 6-3, 3-6, 7-5 असा पराभव करत पुढची फेरी गाठली. सहाव्या मानांकीत अनिरूध्द नल्लापाराजूने समर्थ सहिताचा 6-3, 6-0 असा तर सातव्या मानांकीत राधेय शहाणेने पार्थ देवरूखकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुले:
मानस धामणे(1) वि.वि वेद ठाकूर 6-2, 6-1
अंशूल सातव(4) वि.वि अर्णव कोकणे 6-3, 3-6, 7-5
अनिरूध्द नल्लापाराजू(6) वि.वि समर्थ सहिता 6-3, 6-0
राधेय शहाणे(7) वि.वि पार्थ देवरूखकर 6-2, 6-0
अश्विन नरसिंघानी वि.वि जय पवार(8) 2-6, 6-3, 6-3
शौर्य राडे वि.वि केयूर म्हेत्रे 6-2, 3-6, 6-1
अझमिर शेख वि.वि अर्णव बिशोयी 7-6(4), 3-6, 6-4
नील जोगळेकर वि.वि आदित्य भाटेवरा 6-1, 6-4
ईशान देगमवार वि.वि सुधांशू सावंत 6-1, 6-2
प्रथमेश पाटील वि.वि सौवेद देशमाने 6-2, 6-4