रमणबागमध्ये तंत्रशिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रम

Date:

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) न्यू इंग्लिश स्कूलमध्ये (रमणबाग) नवीन शैक्षणिक धोरणानुसार पाच तंत्रशिक्षण कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करीत असल्याची माहिती शाला समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक पलांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, सदस्य डॉ. आशिष पुराणिक, मुख्याध्यापक सुनील शिवले यांची प्रमुख उपस्थिती होती.
पलांडे म्हणाले, ‘पाचवीसाठी संस्कार वर्ग, सहावीसाठी नाट्यशास्त्र वर्ग, सातवीसाठी रोबोटिकस्, आठवीसाठी टेराकोटा आणि जर्मन, जापनीज या परकीय भाषा आणि नववीसाठी संगणक जोडणी व देखभाल हे नवीन अभ्यासक्रम या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत.’
ते पुढे म्हणाले, ‘नाट्यशास्त्र अभ्यासक्रमासाठी विवेकानंद सभागृहाचे छोट्या नाट्यगृहात रुपांतर करण्यात आले आहे. कनिष्ठ महाविद्यालयात ध्वनिमुद्रण स्टुडिओ उभारण्यात आला आहे. रोबोटिकस्, संगणक, भाषा, गणित आणि विज्ञानाच्या प्रयोगशाळा विकसित करण्यात आल्या आहेत. प्रशालेतील सर्व वर्गांमध्ये इंटरनेटची जोडणी करण्यात आली आहे. शाळेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थ्यांनी दिलेल्या देणगीमधून हे प्रकल्प करण्यात आले. माजी विद्यार्थी डॉ. प्रमोद चौधरी यांनी शाळेला 51 लाख आणि 75 लाख अशी देणगी दिली. माजी विद्यार्थ्यांकडून 12 लाख 44 हजारांची देणगी प्राप्त झाली. त्यातून हे प्रकल्प करण्यात आले.’
डॉ. कुंटे म्हणाले, ‘डीईएसमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहील अशा प्रकारची रचना करण्यात येत आहे. संस्थेच्या सर्व शाळांमध्ये तंत्रशिक्षण कौशल्याचे दोन किंवा तीन विषय शिकविले जाणार आहेत. दर शनिवारी दोन तास या विषयांचे शिक्षण दिले जाणार आहे. फर्ग्युसन महाविद्यालयात अडीच कोटी रुपयांच्या देणगीतून इनक्यूबेशन सेंटर उभारण्यात आले आहे. व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज असून त्यासाठी डीईएस इतर सहयोगी शिक्षण संस्थांना बरोबर घेऊन जाणार आहे.’
डॉ. आशिष पुराणिक यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील तंत्रशिक्षण कौशल्याची माहिती दिली. धनंजय कुलकर्णी यांनी नवीन सुविधा व अभ्यासक्रमांचा दैनंदिन उपयोग याची माहिती दिली. सुहास देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक सुनील शिवले यांनी आभार मानले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करावा-उपराष्ट्रपती...

दीदी कृष्णा कुमारी यांच्या ‘बियॉन्ड द डॉट’ पुस्तकाचे पुण्यात प्रकाशन; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण!

साधु वासवानी मिशनच्या कार्यक्रमात साहित्य, भक्तिसंगीत आणि जीवनमूल्यांचा संगम;...

महावितरणचा वीजचोरांना दणका:तीन दिवसात २५० वीजचोरीची प्रकरणे उघड

६ कोटी २७ लाख रुपयांच्या वीजचोरीचा सुरक्षा व अंमलबजावणी...

शेड पाडल्या, पण अनधिकृत व्यवसाय सुरूच! महापालिकेची अतिक्रमण कारवाई केवळ दिखावा ठरणार?

फ्रंट व साईड मार्जिनमधील अनधिकृत व्यवसायांवर फौजदारी कारवाई करा;...