पुणे, ता. २० जून : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेने ‘कोरोना काळात बालकांची काळजी कशी घ्यायची?’ या विषयावर बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद आगरखेडकर यांचे व्याख्यान आयोजित केले होते. बालकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी नियमित व्यायाम, सकस आहार, स्वच्छतेच्या सवयी आणि सकारात्मक वातावरण निर्मिती आवश्यक असल्याचे मत डॉ. आगरखेडकर यांनी यावेळी व्यक्त केले. नॅशनल मेडिकोज ऑर्गनायझेशन आणि समर्थ भारत या संस्थांचे संयोजन सहकार्य लाभले. शाला समितीच्या अध्यक्षा डॉ. प्राची साठे, सदस्या राजश्री ठकार, मुख्याध्यापिका कल्पना वाघ यांनी मार्गदर्शन केले. शिक्षिका भाग्यश्री हजारे यांनी सूत्रसंचालन आणि प्रतिभा पाखरे यांनी आभार प्रदर्शन केले