पुणे- भारताचे माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या मंगळवारी (ता. ३१ ऑक्टोबर) सकाळी साडेसात वाजता खंडोजीबाबा चौक ते स. प. महाविद्यालय मैदानापर्यंत ‘एकता दौड’ आयोजित करण्यात आली आहे.
संघराज्याच्या एकात्मतेविषयीची भावना दृढ व्हावी या उद्देशाने ‘नवभारत निर्मिती (संकल्प ते सिध्दी २०१७ ते २०२२)’च्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती समन्वयक योगेश गोगावले यांनी कळविली आहे.
पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी साडेसात वाजता रॅलीला हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. या ‘एकता दौड’मध्ये सामाजिक, शैक्षणिक, कला, संस्कृती, क्रीडा, उद्योग, राजकीय क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पाच हजारहून अधिक शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभाग, क्रीडा परिषद, पुणे आणि विविध क्रीडा संघटनांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
अर्जुन पुरस्कार विजेते पद्मभूषण चंदू बोर्डे, ऑलिम्पियन मनोज पिंगळे, रेखा भिडे, धनराज पिल्ले, श्रीरंग इनामदार, हेमंत टाकळकर, शांताराम जाधव, कॅप्टन गोपाल देवांग, सुरेखा द्रविड, शेखर धारवाडकर, काका पवार, शकुंतला खटावकर, निलीमा पौंक्षे-सारोळकर, ऑलिम्पिक खेळाडू बाळकृष्ण अकोटकर, मारुती आडकर, ध्यानचंद पुरस्कार विजेत्या स्मिता शिरोळे-यादव, तेनसिंग नोरगे पुरस्कार विजेते रोहन मोरे, जीवन गौरव राज्य शिवछत्रपती पुरस्कार विजेते बाळासाहेब लांडगे, चंद्रकांत शिरोळे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मोरेश्वर गुर्जर, उत्कृष्ट मार्गदर्शक अरविंद पटवर्धन, अजितसिंग कोचर, राजू मराठे, जागतिक स्पर्धा विजेते आकांक्षा हगवणे, अभिजीत कुंटे आणि अमोल कर्चे तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय पुरस्कार विजेज्या डॉ. मंजु जुगदर आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.