Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

स्मिता करंदीकर यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

Date:

पुणे, ता. २९ – डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या ‘अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स’च्या पर्यवेक्षिका स्मिता श्रीधर करंदीकर यांना केंद्र सरकारचा उत्कृष्ट शिक्षक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. रजत पदक आणि पन्नास हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शिक्षक दिनी (५ सप्टेंबर) नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने ही माहिती कळविली आहे.
श्रीमती करंदीकर यांचा अध्यापनाचा विषय भूगोल आहे. सुरुवातीच्या काळात ङ्गर्ग्युसन, स. प. महाविद्यालय, एसएनडीटी, नौरोजी वाडिया या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. गेली २६ वर्षे त्या अहिल्यादेवी शाळेत सहायक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या वर्षीपासून पर्यवेक्षिका म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे.
एसएससी बोर्डाच्या भूगोल अभ्यास मंडळाच्या त्या सहनिमंत्रक आहेत. भूगोल प्रज्ञा शोध परीक्षेसाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. ‘महाराष्ट्र टॅलेंट सर्च’साठी विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन केले आहे. आकाशवाणी व दूरदर्शनवरील कार्यक्रम, वर्तमानपत्रे व मासिकांमधील लिखाण आणि सीडींची निर्मिती केली आहे.
आदीवासी पाडे व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी श्रीमती करंदीकर नियमितपणे मोङ्गत मार्गदर्शन करीत असतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व्या‘यानमालेत मार्गदर्शन केले आहे.
शाळेमध्ये जपान अभ्यास प्रकल्पाचे त्या सहा वर्षे काम करीत आहेत. जपानी संस्कृतीची माहिती व्हावी यासाठी जपानी भाषेची ओळख, प्रदर्शने, ओरिगामी, इके बाना आदी उपक्रम राबविले जातात. डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, उपाध्यक्ष विकास काकतकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एसबीआय जनरल इन्शुरन्सतर्फे मोहम्मद आरिफ खान यांची डेप्युटी सीईओ म्हणून नियुक्ती

मुंबई; 13 जून 2025: भारतातील आघाडीच्या जनरल इन्शुरन्स कंपन्यांपैकी एक असलेल्या एसबीआय...

सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार: हणमंतराव गायकवाड

'आयसीएआय'तर्फे सनदी लेखापालांसाठी आयोजित 'नवोन्मेष २०२५', दोन दिवसीय विभागीय परिषदेचे...

गणपती मंदिरातील पौरोहित्य करणारे पुजारी यांचा सन्मान

मानाचा चौथा गणपती श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट शतकोत्तर...

समाज कल्याण विभागाच्या निधीबाबत श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी रिपब्लिकन युवा मोर्चाची मागणी

पुणे : अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राज्याच्या सामाजिक न्याय व...