लकी ड्रॉ मधे शबाना नाझीम काझी यांनी जिंकली होंडा ॲक्टीव्हा.
पुणे-शिवजयंती साजरी करत असताना शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आपल्याला दिली आहे हे लक्षात ठेवले पाहिजे व त्यानुसारच आपले आचरण असले पाहिजे असे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले.शिवजयंती निमित्त गत दहा वर्षे सातत्याने कोथरूडच्या छत्रपती शिवाजी पुतळा चौकात क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठानच्या वतीने सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला जातो आणि हा महोत्सव महिलाकेंद्रित असतो हे स्पृहणीय असल्याचे मत ही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.
आजच्या धकाधकीच्या जीवनात तीन हजार महिला लकी ड्रॉ च्या कार्यक्रमाला येतात यातच ह्या महोत्सवाचे यश आहे असे ही ते म्हणाले.क्रिएटिव्ह फौंडेशन आणि कै विश्वनाथ भेलके प्रतिष्ठान तर्फे शिवजयंतीनिमित्त आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप फक्त महिलांसाठी लकी ड्रॉ काढून करण्यात आला.यावेळी महोत्सवाचे संयोजक संदीप खर्डेकर,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,विशाल भेलके ,उमेश भेलके ,प्रतीक खर्डेकर,मोहित भेलके उपस्थित होते.
मायबोली महाराष्ट्राची,शिवछत्रपतींवरील पोवाडा आणि लावणी दंगल अश्या उत्तमोत्तम कार्यक्रमाने हा महोत्सव रंगला व यास कोथरुडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असे संदीप खर्डेकर म्हणाले.महिला या दिवसभर घरात राबत असतात,कुटूंबातील सदस्यांची काळजी वाहताना त्या स्वतःकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात चार आनंदाचे क्षण यावेत यासाठी या महोत्सवाची रचना केली असल्याचे ही संदीप खर्डेकर म्हणाले.
आज ज्या मोठ्या प्रमाणावर स्त्रीयांवर अत्याचार होत आहेत त्याविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी आपल्या मुलींना सक्षम केले पाहिजे आणि प्रत्येक आईने आपल्या मुलावर स्त्री सन्मानाचे संस्कार केले पाहिजेत असे नगरसेविका मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
केवळ महिलांसाठीच्या लकी ड्रॉ चे पहिले बक्षीस होंडा ॲक्टीव्हा स्कूटर च्या भाग्यवान विजेत्या कोथरूड गावठाण मधील शबाना नाझीम काझी या ठरल्या – त्यांच्या डोळ्यातील अश्रू आणि महापौरांच्या हस्ते स्कूटर स्वीकारतानाचा आनंद काही औरच होता.दुसऱ्या क्रमांकाचा फ्रीज हा सौ प्राजक्ता अरुण चव्हाण यांनी तर तिसऱ्या क्रमांकाची वॉशिंग मशीन सौ रुपाली सुहास वाघचौरे यांनी जिंकली.टी व्ही च्या भाग्यवान विजेत्या ठरल्या संगीता रवींद्र दुर्गे,स्वाप्नाली वायकर यांनी मोबाईल,पूजा हुंबे यांनी सिंगल कपाट ,प्रीती खुडे यांनी मायक्रोवेव्ह ओव्हन ,भक्ती मोरे यांनी ३ बर्नर ची शेगडी ,मंदाताई कदम यांनी टीपॉय तर प्रतिभा रुपेश अटक यांनी प्रवासी बॅग जिंकली….ह्या व्यतिरिक्त ११ भाग्यवान महिलां ना पैठणी ही देण्यात आली. सर्व विजेत्यांनी संयोजकां प्रती कृतज्ञता व्यक्त करताना आपले स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले.नगरसेवक राजाभाऊ बराटे,शिवरामपंत मेंगडे,
नगरसेविका हर्षाली माथवड ,वृषालीताई चौधरी,अल्पनाताई वर्पे,शिवसेनेचे नेते शाम देशपांडे,योगेश मोकाटे,उत्तमकाका भेलके ,राजनभाई परदेशी,सारंगशेठ राडकर,नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे विठ्ठल काटे सर ,मकरंद टिल्लू,,शिरीषभाई कुलकर्णी,सीताराम खाडे ,सतीश गायकवाड इ मान्यवरांच्या हस्ते भाग्यवान विजेत्यांना बक्षीसे देण्यात आली.
संदीप खर्डेकर यांनी सूत्रसंचालन तर विशाल भेलके यांनी आभार प्रदर्शन केले.