पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे साधेपणाने विसर्जन

Date:

पुणे- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही कोविडच्या परिस्थितीत होऊ शकली नाही. तरीही मानाच्या श्रींसह महत्त्वाची गणेश मंडळानी परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करत यंदाही साधेपणाने गणरायाला निरोप देत आहेत. पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे साधेपणाने विसर्जन करण्यात आले.

यंदा प्रथेनुसार महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महात्मा फुले मंडई येथील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी दहा वाजता विसर्जन सोहळा सुरू झाला.

मानाच्या पहिल्या कसाब गणपतीचे विसर्जन वेळेनुसार झाले. महामारीच्या संकटामुळे गणपतीचे विसर्जन मंडळाच्या मंडपातच करण्यात आले. गणपतीच्या पालखीला महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह पोलीस सह अतिरिक्त पोलीस उपायुक्त रवींद्र शिसवे यांनी उपस्थिती लावली.

मानाचा पहिला गणपती कसबा गणपती विसर्जन – सकाळी 11.30 वाजता

मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळ – सकाळी 11.35 वाजता

मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळ – दुपारी 12.30 वाजता

मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती- दुपारी एक वाजता

याच दरम्यान तुळशीबाग गणपतीच्या विसर्जनात ढोल-ताशे वाजवले जात असताना पोलीस तिथे पोहोचले आणि ढोल-ताशे वाजवणाऱ्यांचं साहित्य जप्त केलं. यानंतर तिथे थोडी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परवानगी नसतानाही वादन केले जात असल्याने कारवाई केल्यानंतर गोंधळ उडाला.

मात्र काही वेळाने पोलिसांनी जप्त केलेलं साहित्य परत केलं. यानंतर शांततेत मिरवणूक काढत गणपतीचं विसर्जन करण्यात आले.

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे शहरातली सर्व दुकानं बंद ठेवण्यात आली आहेत. तसंच पुणे शहरात आज सात हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कोलंबो परिषदेसाठी काँग्रेसचे नगरसेवक सुनील शिंदे यांची निवड!

पुणे- महापालिकेतील कॉंग्रेसचे नगरसेवक आणि कामगार नेते सुनील...

राज्यात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना, तर घरोघरी जाऊन घरांची यादी आणि गृहगणना 16 मे ते 14 जून 2026 दरम्यान होणार

मुंबई, महाराष्ट्र जनगणना संचालन संचालनालयाने आज मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन...

येरवड्यातील लुंबिनी उद्यानात भीमगीतांची ‘धम्म संध्या’ उत्साहात संपन्न

बुद्ध जयंतीनिमित्त माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका नंदिनी...

परिवर्तन पॅनलचा दणदणीत विजय

जिल्हा परिषद सेवकांची सहकारी पतसंस्था:चेअरमन पदासाठी प्रदीप गोलांडे आणि...