Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

श्रुती हसन -राजकुमार राव सोबत कॅमेरा शेअर करणार मराठमोळी रीना

Date:

मराठी कलाकारांना हिंदी चित्रपटसृष्टी खुणावत आहे, हिंदीतील ग्लेमर आणि प्रसिद्धी अनुभवण्यासाठी मराठीतील अनेक नायक आणि नायिका प्रयत्न करताना दिसतात. आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीतील अनेक कलाकारांनी बॉलीवूडमध्ये यशस्वी कूच देखील केली आहे. अशा या मराठी व्हाया हिंदी सिनेसृष्टीत प्रवास करणाऱ्या कलाकारांमध्ये अभिनेत्री रीना अगरवाल हिचा देखील समावेश होतो. नुकत्याच ‘झाला भोबाटा’ या मराठी सिनेमांतून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली रीना लवकरच हिदीच्या बिग बजेट सिनेमात झळकणार आहे.

अजय के. पन्हालाल दिग्दर्शित ‘बेहेन होगी तेरी’ या रॉमकॉम बॉलीवूड सिनेमात रीना पुन्हा एकदा बॉलीवूडच्या प्रसिद्ध कलाकारांसोबत केमेरा शेअर करताना दिसणार आहे. श्रुती हसन आणि राजकुमार राव ही जोडगोळी असलेल्या या सिनेमात मराठमोळ्या रीनाची कोणती भूमिका असेल हे लवकरच कळेल! या सिनेमाचे सध्या लखनऊ येथे चित्रीकरण सुरु असून, बिग बॉस फेम गौतम गुलाटी देखील यात पाहायला मिळणार आहे. बॉलीवूड चित्रपटात काम करण्याची रीनाची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी रिनाने अमीर खानच्या ‘तलाश’ या सिनेमात दिसून आली होती, यात ती एका महिला पोलीस हवालदाराच्या भूमिकेद्वारे प्रेक्षकांसमोर आली होती.

रिना हिंदीच्या छोट्या पडद्यावरील ‘एजंट राघव’ या मालिकेतूनही प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. हिंदी सिनेसृष्टी खुणावत जरी असली तरी रिनाने मराठी इंडस्ट्रीला कधीच दुय्यम लेखले नाही. ‘अजिंठा’ या मराठी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात करणाऱ्या रिनाने मराठी रंगमंचावरदेखील काम केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सहकारी बँकांनी ग्राहक आणि लोकाभिमुख व्हायला हवेउपमुख्यमंत्री अजित पवार

रामराज्य सहकारी बँक लि. च्या नव्या वास्तूच्या कोनशिलेचा...

संजय राऊतांची लेखणी काही लोकांना पचत नव्हती.. म्हणून पत्रा चाळ ED: शरद पवारांची फटकेबाजी

मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला...

तर मी नरकात जाणं पसंत करेन, जावेद अख्तर यांची पाकिस्तानवर जोरदार टीका

मुंबई “जर मला पाकिस्तान आणि नरक यापैकी एकाची निवड...