Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मनोहारी रूप तुझे श्रीमंत गणराया …भाविकांची उसळे गर्दी तुझी राहू दे अशीच माया ..(व्हिडीओ)

Date:

पुणे- पुण्याचं वैभव , भक्तांची पंढरी , आणि मोठ्ठं आशास्थान म्हणून नाव लौकिक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणराजांच्या रुपाची ख्याती देखील तेवढीच मोठी . अशा या श्रीमंतांचे दर्शन घेण्यासाठी गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून भाविकांची गर्दी उसळते . .. या गणराजाला पहा त्याच्या विलोभनीय  रुपात आणि त्याच्या आसनासाठी बनविलेल्या .. तामिळनाडू तंजावर  येथील श्रीराजराजेश्वर  मंदिराच्या भव्य प्रतिकृतीत  …

गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया… च्या जयघोषात पुष्परथातून निघालेल्या दिमाखदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत श्री राजराजेश्वर मंदिरात दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १२६ व्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला. श्री राजराजेश्वर मंदिरात सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी मोरगाव येथील महान गाणपत्य गणेश योगींद्राचार्यांच्या परंपरेतील डॉ.धुंडीराज पाठक शास्त्री यांच्या हस्ते विधीवत श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. 

यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, सुनील रासने, माणिक चव्हाण,  हेमंत रासने, दत्तोपंत केदारी,सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, राजूशेठ सांकला, यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. मुख्य मंदिरापासून सकाळी ८.३० वाजता श्रीं च्या आगमन मिरवणुकीला प्रारंभ झाला. श्रीं ची विलोभनीय मूर्ती डोळ्यात साठविण्यासोबतच दर्शनासाठी भक्तांनी चौका-चौकात गर्दी केली. मंदिरापासून निघालेल्या मिरवणूक तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे उत्सव मंडपात आली. मिरवणुकीमध्ये अग्रभागी देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, मयूर बँड, प्रभात बँड, दरबार बँड, महिलांचे मानिनी ढोल-ताशा पथक यांसह शालेय विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. मुख्य पूजा मिलींद राहुरकर आणि नटराज शास्त्री गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली झाली.

अशोक गोडसे म्हणाले, अकराव्या शतकाच्या सुरुवातीला साकारण्यात आलेल्या राजराजेश्वर या महादेव मंदिराला युनेस्कोने जागतिक वारसा वास्तूचा दर्जा दिला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात ट्रस्टतर्फे साकारण्यात आलेली ही प्रतिकृती भाविकांकरीता विशेष आकर्षण ठरणार आहे. श्री राजराजेश्वर मंदिराच्या प्रतिकृतीचा आकार ७५ बाय १०० फूट असून ९० फूट उंची आहे. मुख्य सभामंडपातील खांबांची रचना आणखी सुटसुटीत करण्यात आली असून यामुळे भाविकांना सहजतेने दर्शन घेता येणार आहे.

ॠषिपंचमीनिमित्त २५ हजार महिला करणार सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण
ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे शुक्रवार, दिनांक १४ सप्टेंबर रोजी पहाटे ६ वाजता २५ हजार महिला सामुदायिकरित्या अर्थवशीर्ष पठण करणार आहेत. यावेळी फिनोलेक्स ग्रुपचे प्रकाश छाब्रिया, रितू छाब्रिया, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच, शुक्रवारी रात्री १० ते २ वाजेपर्यंत महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुळजाभवानी मंदिराच्या मद्यधुंद‎ पुजाऱ्याची कार्यालयात तोडफोड‎, गैरवर्तनप्रकरणी 3 महिने मंदिरात प्रवेशाला बंदी‎

तुळजापूर‎-तुळजाभवानी मंदिर कार्यालयात मद्यधुंद‎अवस्थेत सुरक्षा रक्षकांना शिवीगाळ करत‎पुजाऱ्याने तोडफोड...

शरद पवार यांचा पक्ष मूळ पक्ष आहे. ते अजित पवार यांच्या गटात कशासाठी जातील?-खासदार संजय राऊत

अजित पवार हे शरद पवार यांच्या पक्षाला त्यांच्या गटामध्ये...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका:फेर प्रभाग रचना करा-निवडणूक आयोगाचे राज्य सरकारला निर्देश

लोकशाहीच्या मूळ तत्वांचा अवमान-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेवर न...